Mumbai Press Club Election : पत्रकारितेच्या क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'मुंबई प्रेस क्लब'च्या निवडणुकीचा निकाल अधिकृतपणे जाहीर झाला आहे. या निवडणुकीत 'सेव्ह प्रेस क्लब' (Save Press Club) पॅनेलने बाजी मारली आहे. मुंबई प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सुरेंद्र गांगण यांची बहुमताने निवड झाली आहे. त्यांनी 'प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक' पॅनेलचे उमेदवार ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांचा 322 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. एकूण 862 मतदान पार पडले.
'सेव्ह प्रेस क्लब'चे वर्चस्व
या निवडणुकीत सर्व महत्त्वाच्या पदांवर 'सेव्ह प्रेस क्लब' पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नव्याने निवडून आलेली ही कार्यकारिणी पत्रकारांचे हित, सुरक्षा आणि वृत्तपत्रांच्या/माध्यमांच्या अधिकारांसाठी आगामी काळात काम करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेंद्र गांगण यांनी सांगितले.
कुणाला कोणकोणतं पद आणि किती मतं मिळाली?
अध्यक्षपद
सुरेंद्र गांगण (विजेते): 582 मते
राजीव खांडेकर: 260 मते
चेअरमन
एस. बालकृष्णन (विजेते): 510 मते
मयुरेश गणपत्ये: 322 मते
व्हाइस-चेअरमन
धोंडीबा म्हस्के (विजेते): 537 मते
आशिष राजे: 291 मते
सचिव
अनिल कुमार सिंह (विजेते): 513 मते
सौरभ शर्मा: 315 मते
सह-सचिव
सुधाकर कश्यप (विजेते): 517 मते
ऋचा कानोलकर: 324 मते
खजिनदार
ओम प्रकाश तिवारी (विजेते): 487 मते
शशांक परेड: 335 मते
व्यवस्थापकीय समितीत निवडून आलेले १० सदस्य
१. वैभव परब
२. स्वप्निल शिंदे
३. पूनम अपराज
४. मनीषा रेगे
५. अनिता शुक्ला
६. शाहिद अन्सारी
७. आदित्य दुबे
८. मधू नैनान
९. बेनीचन के. जे.
१०. उमेश गोस्वामी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world