Mumbai-Pune Dam Water Level: गुडन्यूज! मुंबई-पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली; दोन्हीकडील धरणांत किती जलसाठा?

Mumbai Pune Dam Water Level : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 83.68%, तर पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 प्रमुख धरणांमध्ये 82.86% पाणीसाठा जमा झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

यंदा मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले असले, तरी जुलै महिन्यात मुंबई आणि पुण्याच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार आणि सततच्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांना पाणी पुरवणाऱ्या जलाशयांनी गेल्या वर्षीच्या याच काळातील सरासरीच्या बरोबरीने साठा गाठला आहे.

पुणे धरण साठा: 24.15 टीएमसी पाणी जमा

गेल्या 2 दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने खडकवासला प्रकल्पातील धरणांची पातळी वेगाने वाढली आहे.

एकूण पाणीसाठा: 24.15 टीएमसी (82.86%)
गेल्या वर्षीचा साठा (याच दिवशी): 23.98 टीएमसी (82.27%)

पुण्यातील प्रमुख धरणांची स्थिती

  • खडकवासला: 100%
  • पानशेत: 87.32%
  • वरसगाव: 81.86%
  • टेमघर: 65.24%

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या भीतीने जिलबीने बदलला रंग; नेमकं काय घडलंय?)

मुंबई तलाव साठा: 83.68% उपयुक्त पाणीसाठा

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) जल अभियंता विभागाच्या अधिकृत अहवालानुसार, मुंबईला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावांमध्ये एकूण 12,11,188 ml (83.68%) उपयुक्त पाणी साठवले गेले आहे. 

Advertisement

मुंबईतील प्रमुख तलावांची स्थिती

  • मोडक सागर: 100% (ओवरफ्लो)
  • विहार: 100% (ओवरफ्लो)
  • तुळशी: 100% (ओवरफ्लो)
  • तानसा: 98.45%
  • भातसा: 82.68%
  • मिडल वैतरणा: 80.73%
  • अप्पर वैतरणा:68.11%

(नक्की वाचा-  VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई)

नागरिकांना मोठा दिलासा

मुंबई आणि पुण्याच्या धरणांमध्ये मुबलक साठा जमा झाल्याने येत्या काळात दोन्ही महापालिकांकडून लागू होणारी संभाव्य पाणीकपात टळण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे उर्वरित धरणेही लवकरच 100% भरतील.
 


Topics mentioned in this article