Mumbai Pune Expressway : गेल्या 4 तासांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून मुंबईला येणारी वाहतूक ठप्प

 मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गॅसचा टँकर पलटी झाला असून टँकरमधील प्रोपोलिन गॅस लिक झाला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

मेहबुब जमादार, प्रतिनिधी

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅसचा टँकर पलटी झाला असून टँकरमधील प्रोपोलिन गॅस लिक झाला आहे. त्यामुळं मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सायंकाळी 6.15 च्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ ही घटना घडली आहे. दरम्यान टँकर बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

4 तासापासून एक्सप्रेस वेवरुन मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प...

साधारण ६.१५ वाजेपासून मुंबई-पुणे एक्सप्रेसवरुन मुंबईकडे येणारी वाहतूक बंद आहे. गेल्या साडे चार तासांपासून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद आहे. दरम्यान थोड्याच वेळात घटनास्थळी केमिकल तज्ज्ञांचे पथक टँकरची गळती थांबविण्याचा प्रयत्न करणार आहे. गळती थांबविण्यात यश आल्यानंतर वाहतून सेवा सुरू केली जाईल.

Advertisement

नक्की वाचा - Lonavala News: मुंबईकर LLB विद्यार्थिनीचा लोणावळ्यात मृत्यू! 400 फूट खोल दरीत मृतदेह, तिच्यासोबत काय घडलं?

साधारण 5.15 पासून मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मुंबईकडे येणारी वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गांवरून बोरघाटातून खोपोली मार्गे हलकी प्रवासी वाहनाची वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. घटनास्थळी खालापूर तहसीलदार अभय चव्हाण, DYSP डॉ. विशाल नेहूल, खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे, खोपोली फायर ब्रिगेड टीम आणि IRB यंत्रणा, डेल्टा फोर्स, महामार्ग पोलीस, हेल्प फॉउंडेशनची रेस्क्यू टीम उपस्थित आहे.

Topics mentioned in this article