मेहबुब जमादार, प्रतिनिधी
Mumbai Pune Expressway traffic jam : शनिवार, रविवार आणि दीपावलीच्या सुट्या यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी आणि पर्यटक घराबाहेर पडल्याने आजही मुंबई-पुण्या एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. 17 आणि 18 ऑक्टोबरलाही दिवसभर अमृतांजन ब्रिज ते खोपोली एग्झिटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर आजही (19 ऑक्टोबर) याच ठिकाणी सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. दोन दिवसांपासून या भागात वाहतूक कोंडी असल्याने याचा फटका वाहन चालकांना, पर्यटक आणि चाकरमान्यांना होत आहे. आज तर खोपोली एग्झिट ते खंडाळा घाटापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे.
आधी वाहतूक कोंडीचे अपडेट पाहा..
मुंबईहून पुण्याला जात असाल तर आधी वाहतुकीचे अपडेट्स तपासा. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय. वाहनांची संख्या वाढल्यानं एक्सप्रेसवेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळपासूनच एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत घरी जाणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. लेनची शिस्त न पाळणे आणि ओव्हरटेक करण्याची स्पर्धा यामुळेही वाहतूक कोंडी वाढताना दिसतेय. खंडाळा महामार्ग वाहतूक पोलीस एक्सप्रेस वेवर ब्लॉक घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
नक्की वाचा - Pune News: डोंगर फोडून रस्ता! वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या रस्त्याचा मार्ग मोकळा, कोर्टाचा मोठा निर्णय
प्रवाशांचा संताप...
दिवाळीनिमित्ताने घरी जायला निघालेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. तासन् तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करू, त्यांना जास्तीत जास्त वेळ देऊ असा विचार करून निघालेल्या नागरिकांना मात्र वाहतूक कोंडीत वेळ घालवावा लागत आहे. सर्वसाधारणपणे सण-उत्सावांच्या काळात मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. अशावेळी आधीच वाहतुकीची तयारी का केली नाही असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. मोठ्या वाहनांना दिवसा बंदी असताना मोठ्या संख्येने नियमांची पायमल्ली करीत मोठी वाहनं रस्त्यांवरुन धावताना दिसत आहे. परिणामी वाहतूक कोंडी अधिक वाढल्याचं चित्र आहे.