जाहिरात

Pune News: डोंगर फोडून रस्ता! वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या रस्त्याचा मार्ग मोकळा, कोर्टाचा मोठा निर्णय

शिवाजीनगर आणि कोथरूड परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हा पर्यायी मार्ग असेल.

Pune News: डोंगर फोडून रस्ता! वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या रस्त्याचा मार्ग मोकळा, कोर्टाचा मोठा निर्णय
पुणे:

राहुल कुलकर्णी 

पुण्यासाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे.  बालभारती पौड रोडला जोडणाऱ्या वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या रस्त्याला पर्यावरण परवानगी घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे या मार्गाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बालभारती ते पौड रस्त्यादरम्यानचा दोन ते  सव्वादोन किलोमीटरचा रस्ता भांडारकर संस्थेजवळील टेकडीवरून जाणार आहे. या रस्त्याला आक्षेप घेत काही सामाजिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई आणि विनोद चंद्र यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. शिवाजीनगर आणि कोथरूड परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग असलेल्या या रस्त्याला पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या विरोधामुळे बराच विलंब झाला आहे. यामुळे प्रकल्पाचा खर्च देखील काही पटीत वाढला आहे. ही बाब महालिकेच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने महापालिकेने या कामासाठी इन्व्हायर्न्मेंट क्लिअरन्स घ्यावा आणि त्यानंतर काम करावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अशी माहिती महापालिकेच्या विधी अधिकारी निशा चव्हाण यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर अधिक तपशील समजू शकेल असे त्या म्हणाल्या. महापालिकेच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, ऍड. अभिजीत कुलकर्णी, ऍड. राहुल गर्ग, ऍड. धवल मल्होत्रा आणि ऍड. निशा चव्हाण यांनी काम पाहिले. डॉ. सुषमा दाते आणि आय एल एस विधी महाविद्यालय या प्रकरणी न्यायालयात गेले होते.

नक्की वाचा - Pune MHADA: त्वरा करा, आता नाही तर कधीच नाही! पुण्यात म्हाडाने भन्नाट घरांचा पेटारा उघडला, जाणून घ्या लोकेशन

प्रकल्पाबद्दल आक्षेप काय होता?  

  • पर्यावरणीय चिंता : रस्ता वेताळ टेकडीच्या हरित पट्ट्यातून जातो. त्यामुळे झाडे तोडली जातील अशी भीती आहे.
  • पर्यावरणवादी संघटनांचा विरोध : नागरी चेतना मंच, सुषमा दाते आणि इतर पर्यावरणप्रेमींनी यावर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.
  • सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी (CEC) ने “हा भाग Deemed Forest मध्ये मोडतो” असे निरीक्षण दिले आणि बांधकाम थांबविण्याची सूचना केली.
  • पुणे महापालिकेचा दावा : रस्ता वेताळ टेकडीला न बाधक पद्धतीने आणि फ्लायओव्हर तंत्राने बांधण्यात येईल. त्यामुळे पर्यावरणाला हानी होणार नाही.
  • वेताळ टेकडीतील झाडे, जैवविविधता आणि भूजल पातळीवर परिणाम होईल.
  • “डोंगर फोडून रस्ता” केल्यास पर्यावरणीय समतोल बिघडेल.
  • विद्यमान रस्त्यांचे सुयोग्य नियोजन केल्यास हा नवीन रस्ता आवश्यक नाही

प्रकल्पाचे फायदे

  • एफ.सी. रोड, गणेशखिंड रोडवरील वाहतुकीचा ताण कमी होईल.
  • कोथरूड-शिवाजीनगर प्रवासात वेळ वाचेल (सुमारे 20–25 मिनिटांची बचत).
  • डेहूरोड-शिवाजीनगर आणि चांदणी चौक-पुणे सेंट्रल दरम्यान वाहतूक पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.

प्रकल्पाचा सारांश घटक माहिती

  • रस्त्याचे नाव बालभारती ते पौड फाटा रस्ता
  • अंतर सुमारे 2.1 ते 2.3 किमी
  • रुंदी अंदाजे 30 मीटर
  • संस्था पुणे महानगरपालिका (PMC)
  • प्रमुख उद्दिष्ट कोथरूड-शिवाजीनगर वाहतुकीवरील ताण कमी करणे
  • अंदाजित खर्च ₹160 कोटींच्या आसपास (अद्ययावत अंदाज बदलू शकतो)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com