जाहिरात

Mumbai Rain : बत्ती गूल, घरात पाणी, रेल्वे खोळंबली; पाऊस उसंत कधी घेणार? हवामान विभागाकडून नागरिकांना दिलासा

पुढील पाच दिवस कसं असेल हवामान? हवामान विभागाने दिले संकेत...

Mumbai Rain : बत्ती गूल, घरात पाणी, रेल्वे खोळंबली; पाऊस उसंत कधी घेणार? हवामान विभागाकडून नागरिकांना दिलासा

Weather Update : मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील नागरिकांना पावसाने सळो की पळो करून सोडलं आहे. मुंबई उपनगरातील अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला तर बत्ती गूल झाल्याने नागरिकांवर मेणबत्तीच्या प्रकाशात स्वयंपाक करावा लागत आहे. अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

मुंबईकरांची तर दैना उडाली आहे. पश्चिम रेल्वेची सेवा खोळंबली असून मध्य रेल्वेवरील गाड्या धीम्या गतीने सुरू आहेत. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. दरम्यान पाऊस कधी विश्रांती घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.   

Latest and Breaking News on NDTV

मुंबईतील पाऊस कधी विश्रांती घेणार?

दरम्यान हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने ७ जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, वाशिम, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट दिला आहे. तर ठाणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, सातारा घाट, अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, नाशिक घाट, पुणे घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. ८ जुलै रोजी पालघर, नाशिक घाट, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट तर पुणे घाट, सातारा घाट याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील चार दिवसात मुंबई आणि उपनगरांना कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईकरांना काहीसा दिला मिळण्याची शक्यता आहे.  

७ जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर घाट,अहिल्यानगर, धुले जळगाव, वाशीम आणि वर्धा, नागपूर येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, बुलडाणा, अकोला, सातारा घाट आणि अमरावती येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

८ जुलै रोजी पालघर, नाशिक घाट, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट, बुलडाणा, अकोला, अमरावती आणि वर्धा येथे यलो अलर्ट राहणार असून, पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट असेल.

९ जुलै रोजी रत्नागिरी, सातारा घाट, पुणे घाट, खंडाळा घाट, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

१० जुलै रोजी वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम राहणार आहे. ११ जुलै रोजी अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई वेधशाळेने नागरिकांनी स्थानिक प्रशासन व हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.


 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com