Pune-Mumbai Connecting Link Road: पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेला पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे.
सळधार पावसामुळे मिसिंग लिंकच्या शेवटच्या टप्प्यात दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, महामार्ग पोलिसांच्या आठ ते नऊ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मलबा हटवून मिसिंग लिंकच्या दोन लेन पुन्हा वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक आता सुरळीत सुरू झाली आहे.
घाटातील अत्यंत प्रतिकूल हवामान, सतत पडणारा मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि दाट धुक्यामुळे झालेली कमी दृश्यमानता अशा अनेक आव्हानांचा सामना करत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) पथकांनी सातत्याने काम केले आणि हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित केला.
🚨 IMPORTANT UPDATE
— MSRDCofficial (@MSRDC_official) July 6, 2026
✅ Traffic has resumed on the Pune–Mumbai Connecting Link Road. Vehicular movement has been restored after completion of extensive safety operations.
Despite relentless monsoon conditions, including heavy rainfall, strong winds and low visibility, MSRDC… pic.twitter.com/LCRirbWao0
कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक सुरु करण्यापूर्वी एमएसआरडीसी आणि तांत्रिक पथकांकडून खालील अत्यंत महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आल्या. रस्त्याच्या बाधित भागावर पडलेला सर्व ढिगारा आणि दरडीचे अवशेष तातडीने बाजूला करण्यात आले. वाहतूक सुरक्षित व्हावी यासाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करून मुख्य रस्ता पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला.
(नक्की वाचा- Nashik Rain: नाशिक जिल्ह्याला 'रेड अलर्ट'; त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचा इशारा; जिल्ह्यातील सद्यस्थिती काय?)
ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचा प्रयत्न
तांत्रिक तज्ज्ञांच्या पथकाने 'टनेल 2' आणि त्याला लागून असलेल्या डोंगराच्या कड्यांची सखल पाहणी केली, जेणेकरून कोणताही सैल झालेला दगड किंवा माती पुन्हा रस्त्यावर येऊन धोका निर्माण होणार नाही. परिसराची हवाई पाहणी करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षणाचा प्रयत्न करण्यात आला; मात्र दाट धुके, मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे ड्रोन उडवण्याच्या मोहिमेवर मर्यादा आल्या.
सुरक्षेची खात्री पटल्यानंतरच वाहतूक पूर्ववत
एमएसआरडीसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, रस्ता सुरू करण्याची घाई न करता सर्व आवश्यक सुरक्षा चाचण्या आणि तांत्रिक मूल्यमापन पूर्ण झाल्यावरच वाहतूक सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी महामंडळ पूर्णपणे कटिबद्ध आहे.
नागरिकांना प्रशासनाचे आवाहन
जरी रस्ता सुरू झाला असला, तरी सध्या धरण क्षेत्र आणि घाट परिसरात मान्सून अत्यंत तीव्र आहे. त्यामुळे नागरिकांनी अतिशय आवश्यक काम असल्याशिवाय प्रवास करणे टाळावे आणि प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या वाहतूक नियमावलीचे काटेकोर पालन करावे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world