Mumbai News: मुंबईतील शिक्षिकेवर बलात्काराचा आरोप, विद्यार्थी'प्रेमी' महिलेला जामीन मंजूर

Mumbai News: या विद्यार्थ्यासोबत तिने गाडीमध्येच संबंध ठेवल्याचा आरोप असून पोलिसांनी ही गाडी जप्त केली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Teacher: 40 वर्षीय महिलेला जामीन मंजूर करण्यात आला आहे (Photo- Gemini AI)
मुंबई:

मुंबईतील विशेष पॉक्सो POCSO न्यायालयाने 40 वर्षीय शिक्षिकेला जामीन मंजूर केला आहे. या शिक्षिकेवर 16 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या शिक्षिकेला गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. ही शिक्षिका दोन मुलांची आई असून तिने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सविस्तर प्रत अद्याप उपलब्ध झालेली नाही.  

( नक्की वाचा: गोळ्या दिल्या, दारू पाजली; मुंबईतील बड्या शाळेच्या वासनांध शिक्षिकेचे भयंकर कृत्य )

प्रकरण नेमके काय आहे ?

या शिक्षिकेतर्फे नीरज यादव आणि दीपा पुंजानी या दोन वकिलांनी कोर्टामध्ये बाजू मांडली होती. या दोघांनी युक्तिवाद केला होता की त्यांच्या अशिलाविरोधात म्हणजेच शिक्षिकेविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तिच्या चौकशीसाठी पोलीस कोठडीची गरज नाहीये. पोलिसांनी या शिक्षिकेविरुद्ध तसेच तिच्या एका मैत्रिणीविरुद्ध पॉक्सो कायदा 2012 च्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. या शिक्षिकेने ती ज्या शाळेत शिकवत होती त्या शाळेतील विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकाराला कंटाळल्याने विद्यार्थ्याने शिक्षिकेशी असलंला संपर्क तोडून  टाकला होता. यामुळे या शिक्षिकेने तिच्या मैत्रिणीला विद्यार्थ्याकडे पाठवून संपर्क साधण्यास सांगितले होते. 

( नक्की वाचा: बाप रडत होता, रशियन आई लेकाला घेवून फुर्रर्रssss!,सर्वोच्च न्यायालयही हैराण कारण... )

या शिक्षिकेवर आरोप करण्यात आला आहे की या विद्यार्थ्याला एकांतात नेऊन तिने त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवले होते. या विद्यार्थ्यासोबत तिने गाडीमध्येच संबंध ठेवल्याचा आरोप असून पोलिसांनी ही गाडी जप्त केली होती. या शिक्षिकेने विद्यार्थ्याला पंचतारांकीत हॉटेलमध्ये नेऊन तिथेही त्याच्यासोबत संबंध ठेवल्याचा आरोप आहे.  हे संबंध विद्यार्थ्याच्या मर्जीशिवाय ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. 

Topics mentioned in this article