जाहिरात

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक स्थागित!

मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता  (Mumbai University Senate Election)  22 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार होतं.

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक स्थागित!
मुंबई:

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. पदवीधर सिनेटची निवडणूक पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता  (Mumbai University Senate Election)  22 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार होतं. मात्र ही निवडणूक पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.  

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील कलम 8 (7) अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त आदेशान्वये दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी नियोजित असलेली पदवीधर सिनेट निवडणूक शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

Latest and Breaking News on NDTV

सिनेट निवडणुकीत ठाकरे यांची युवा सेना विरुद्ध ( Yuva Sena vs ABVP) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा सामना होणार होता. महाराष्ट्र निर्माण विद्यार्थी सेनेने या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केले नव्हते. तर छात्र भारती आणि बहुजन विकास आघाडी यांनीही उमेदवार उभे केले होते. शिंदे यांच्या शिवसेनेकडून सिनेट निवडणुकीत उमेदवार उभे केले नव्हते. सलग दुसऱ्यांदा सिनेट निवडणुकीला स्थगिती दिल्याने चर्चा सुरू झाली आहे. 

ठाकरे गटाचे नेते काँग्रेसच्या नेत्यांवर भयंकर संतापले, जागावाटपाच्या बैठकीत जबरदस्त ड्रामा

नक्की वाचा - ठाकरे गटाचे नेते काँग्रेसच्या नेत्यांवर भयंकर संतापले, जागावाटपाच्या बैठकीत जबरदस्त ड्रामा

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उमेदवारांची नावे
हर्षद भिडे 
प्रतीक नाईक 
रोहन ठाकरे 
प्रेषित जयवंत 
जयेश शेखावत 
राजेंद्र सायगावकर 
निशा सावरा 
राकेश भुजबळ 
अजिंक्य जाधव 
रेणुका ठाकूर

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक युवा सेनेच्या उमेदवारांची नावे  
प्रदीप सावंत
मिलिंद साटम
परम यादव
अल्पेश भोईर
किसन सावंत
स्नेहा गवळी
शीतल शेठ   
मयूर पांचाळ  
धनराज कोहचडे 
शशिकांत झोरे