Mumbai News: मुंबईकरांनो पाणी साठवून ठेवा! मुलुंड, भांडुप आणि ठाण्यात 27 जानेवारीपासून पाणीकपात

Mumbai News: मुलुंड (पश्चिम) येथील 2400 मिमी व्यासाच्या वैतरणा मुख्य जलवाहिनीवरील 12 जोडण्या 2750 मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा वाहिनीवर हलवण्यात येणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुलुंड (पश्चिम) येथील वैतरणा मुख्य जलवाहिनीवरील जलजोडण्या स्थलांतरित करण्याचे आणि भांडुपमधील खिंडिपाडा येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या तांत्रिक कामामुळे मंगळवार, 27 जानेवारी रोजी सकाळी 10 ते बुधवार, 28 जानेवारी 2026 सकाळी 10 वाजेपर्यंत अनेक भागांतील पाणीपुरवठा खंडित होणार आहे.

दुरुस्तीचे स्वरूप

मुलुंड (पश्चिम) येथील 2400 मिमी व्यासाच्या वैतरणा मुख्य जलवाहिनीवरील 12 जोडण्या 2750 मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा वाहिनीवर हलवण्यात येणार आहेत.  भांडुपमधील खिंडिपाडा येथील २४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीस लोखंडी झाकण बसवण्याचे काम पूर्ण केले जाईल.

पाणीपुरवठा बंद राहणारे मुख्य भाग

'टी' विभाग (मुलुंड पश्चिम)

अमर नगर, पंचशील नगर, हनुमानपाडा, मुलुंड वसाहत, स्वप्ननगरी, वीणा नगर, योगी हिल, व्हॅली नगर, घाटीपाडा आणि गुरुगोविंद सिंग मार्ग परिसर. मुलुंड-गोरेगाव लिंक रोड परिसर, एलबीएस मार्ग, डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, महात्मा गांधी मार्ग, नाहुरगाव आणि नजीकचा परिसर.

(नक्की वाचाPune News: चुकलं की हुकलं! सोडतीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये महापौरपदासाठी ट्वीस्ट, मोठी रस्सीखेच)

'एस' विभाग (भांडुप पश्चिम)

लोअर खिंडिपाडा आणि अप्पर खिंडीपाडा परिसर.

ठाणे शहर

किसन नगर (पूर्व व पश्चिम) आणि भटवाडी परिसर.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

दुरुस्तीच्या कामाच्या कालावधीसाठी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. दुरुस्तीच्या 24 तासांत पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पुढील काही दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article