पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील (Pune International Airport) नव्याने उभारण्यात आलेले टर्मिनलचे आज मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहे. पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील नव्याने उभारण्यात आलेले टर्मिनल आज मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहे. नव्या टर्मिनलवरून विमान प्रवास करणाऱ्या पहिल्या प्रवाशाला यावेळी मोहोळ यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला.
गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत देशात 469 नवीन हवाई मार्ग सुरू झाले असून दिल्ली, बंगळूरू आणि अयोध्या यासारख्या विमानतळावर नवीन टर्मिनल उभी राहिली आहेत. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशीच ही कामगिरी असून आगामी काळात देशभरात आणखी 20 ते 25 नवीन विमानतळाची उभारणी केली जाणार असल्याचं मोहोळ यांनी स्पष्ट केले. पुण्यातील नव्या टर्मिनलमुळे वर्षाला सुमारे 90 लाख ते 1 कोटी प्रवाशांची सुलभ वाहतूक इथून करणे शक्य होणार असून प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटेल अशी वास्तु यानिमित्ताने उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले.
नक्की वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर, गोरेगाव-मुलुंड मार्गातील बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन होणार
जुन्या टर्मिनलमधील सर्व सेवा लवकरच नव्या टर्मिनलमधून उपलब्ध करून दिल्या जातील असे मोहोळ यावेळी म्हणाले. पुण्यातील विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत अपुरे पडणारे जुने टर्मिनल लक्षात घेऊन लोहगाव विमानतळावर या नवीन टर्मिनलची उभारणी करण्यात आली असून पुण्याची संस्कृती आणि समृध्द परंपरा यांचे दर्शन या वास्तुमधून घडेल अशा पद्धतीने ते सजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने 10 मार्च रोजी या टर्मिनलचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर सर्व अपूर्ण कामे पूर्ण करून आज हे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत कार्यान्वित झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world