जाहिरात

Shirdi News: शिर्डी-शनिशिंगणापूरला जाणाऱ्यांनी काळजी घ्या, 'तो' महामार्ग 3 तासांपासून ठप्प, प्रवासी हैराण

अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर-मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Shirdi News: शिर्डी-शनिशिंगणापूरला जाणाऱ्यांनी काळजी घ्या, 'तो' महामार्ग 3 तासांपासून ठप्प, प्रवासी हैराण
Nagar-Manmad Heavy Traffic Jam

सुनील दवंगे, प्रतिनिधी 

Nagar-Manmad Highway Traffic Jam News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर-मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेषतः राहुरी कारखाना ते गुहा या दरम्यान गेल्या तीन तासांपासून वाहनांची प्रचंड कोंडी झाल्याने प्रवाशांचे अक्षरशः हाल होत आहेत. शिर्डी आणि शनिशिंगणापूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने भाविकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था प्रवाशांसाठी डोकेदुखी 

रस्त्याचे काम सुरू असताना योग्य नियोजनाचा अभाव, एकेरी वाहतूक आणि अवजड वाहनांची बेफाम वर्दळ यामुळे हा महामार्ग अक्षरशः ठप्प झालाय.नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर सध्या सुरू असलेले रस्त्याचे काम आणि त्यासोबतच विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था आता प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

नक्की वाचा >>HSC Result 2026 Date : सर्वात मोठी बातमी! 'या' तारखेला लागणार बारावीचा निकाल, कुठे पाहता येणार? वाचा डिटेल्स

तीन तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा

राहुरी कारखाना ते गुहा या मार्गावर गेल्या तीन तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनांची गती पूर्णपणे मंदावली आहे.सकाळपासून सुरू झालेली ही कोंडी आता संध्याकाळपर्यंत कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे,अशी माहिती पोलीस अधिकारी भाऊसाहेब आव्हाड यांनी दिली आहे. 

नक्की वाचा >>  Dombivli News: डोंबिवलीचा रील स्टार सुरेंद्र पाटीलचं 12 वर्षांपूर्वीचं कांड उघड, तरुणाची हत्या, बारवी डॅम अन्..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com