Nagpur-Nanded Flight: नागपूर-नांदेड प्रवास अवघ्या 50 मिनिटात, विमानसेवा 31 मार्चपासून सुरु होणार

Nagpur-Nanded Flight Services: नागपूर ते नांदेड दरम्यानची विमानसेवा 31 मार्च 2026 पासून पुन्हा सुरू होणार आहे. अवघ्या 50 मिनिटांत हे अंतर कापले जाणार असून प्रत्येकी 2326 रुपयांपासून तिकीट दर सुरू होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि नांदेड यांच्यातील अंतर आता कमी होणार आहे. येत्या 31 मार्च 2026 पासून या दोन्ही शहरांदरम्यान नियमित विमानसेवा सुरू होत आहे. 'स्टार एअर' या खासगी विमान कंपनीने या मार्गावर आपली सेवा देण्याचे निश्चित केले असून, यामुळे 7 तासांचा रस्ते प्रवास आता केवळ एक तासाच्या आत पूर्ण होणार आहे.

विमानसेवेचे वेळापत्रक (शुक्रवार वगळता दररोज)

प्रवाशांच्या सोयीसाठी ही सेवा आठवड्यातून सहा दिवस (शुक्रवार सोडून) उपलब्ध असेल.

नांदेड ते नागपूर: सकाळी 11.20 वाजता निघून दुपारी 12:10 वाजता पोहोचेल.
नागपूर ते नांदेड: दुपारी 12.40 वाजता निघून दुपारी 1.30 वाजता पोहोचेल.

(नक्की वाचा-  Ajit Pawar Plane Case: अजितदादांच्या अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; व्ही के सिंगचा CID समोर खळबळजनक दावा)

प्रवासाचं भाडे किती असणार?

या मार्गावर 88 आसनी छोटे विमान वापरले जाईल, ज्यामध्ये सर्व जागा 'इकॉनॉमी क्लास'च्या असतील. प्रवासाचे भाडे किमान 2326 रुपये असून ते मागणीनुसार बदलू शकते. नांदेडहून हे विमान पुढे गोवा (मोपा विमानतळ) येथे जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पर्यटकांना मोठी सोय होईल.

भाविक आणि व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर

नांदेड येथील सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा दर्शनासाठी नागपूरहून जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. रस्ते मार्गाने लागणारे 6 ते 7 तास आता वाचणार असल्याने वृद्ध आणि पर्यटकांना याचा मोठा लाभ होईल. तसेच, दोन्ही शहरांमधील व्यावसायिक संबंध दृढ होण्यासही यामुळे मदत होणार आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Pune News: पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर; भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कुणाला संधी?)

31 मार्च रोजी नांदेडच्या श्री गुरु गोबिंद सिंघजी विमानतळावर खासदार अशोक चव्हाण या पहिल्या विमानाचे स्वागत करतील. तसेच, स्टार एअर नागपूर ते किशनगड (अजमेर) ही विमानसेवा पुण्यापर्यंत वाढवण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे नागपूरकरांना व्हाया किशनगड पुणे प्रवास करणेही शक्य होईल.

Topics mentioned in this article