
संजय तिवारी
इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अकरा वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली समोर आली आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा भागात घडली. भयंकर बाब म्हणजे अपहरण करून त्यामुलाची हत्याही करण्यात आली. विशेष म्हणजे त्या मुलाच्या गावातील तिन मुलांनीच हे कृत्य केल्याचेही आता उघड झाले आहे. नागपूर पोलिसांनी मृतदेह साडल्याच्या काही तासांतच तिघा आरोपींना अटक केली आहे. या अपहरण आणि खून प्रकरणा मागचे कारण समोर येताच पोलीस ही हादरून गेले आहेत. या हत्येनं परिसरात मात्र खळबळ उडाली आहे.
जितू युवराज सोनेकर हा खापरखेडा इथं राहातो. तो शंकरराव चव्हाण विद्यालयात सहाव्या वर्गात शिकत होता. 15 सप्टेंबर रोजी जितू शाळेसाठी घरून निघाला. मात्र शाळा सुटल्यानंतर घरी परतलाच नाही. त्याची मिसिंग तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली. त्याच्या मित्रांनी जितूला कारमध्ये बसवल्याचे सांगितलं. पोलीस ही त्यानुसार शोध घेत होते. पण पोलीसांना त्याचा थांगपत्ता लागलाच नाही. अखेर बुधवारी चनकापूर येथील डब्ल्यूसीएल कॉलनीलगतच्या शिवारात गुराख्याला लहान मुलाचा मृतदेह आढळला. तो शाळेच्या गणेशात होता. मृतदेह झुडपात दिसून आला. ही बाब तातडीने पोलिसांना कळवण्यात आली.
पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी ही केली. गळा आवळून हत्या केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. शिवाय हा मृतदेह हरवलेल्या जितू सोनेकरचा असल्याचं ही स्पष्ट झालं. त्यानंतर पोलीसांच्या तपासाची चक्र वेगात फिरायला लागली. जितूच्या वडिलांनी शेत विकल्याची माहिती पोलिसांना समजली. त्या दृष्टीने तपास सुरू झाली. जसं शेत विकल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती तशी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाला ती समजली होती. त्यातूनच जितूच्या अपहरणाचा कट रचला गेला. जितूचे शाळेतून सुटल्यानंतर अपहरण करण्यात आले.
जितूचे अपहरण केल्यानंतर त्याच्या वडीलांकडून खंडणी मागण्याचा प्लॅन होता. तसे आरोप करण्याच्या तयारीत ही होते. पण अपहरण केल्यानंतर जितू त्यांना अनेक प्रश्न विचारू लागला. त्यामुळे आरोपीं समोर मोठी अडचण निर्माण झाली होती. ते चांगलेच फसले होते. त्यामुळे खंडणी मागण्या आधीच त्यांनी जितूचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी तो मृतदेह दोन दिवस लपवून ठेवला. त्याच वेळी पोलीसात तक्रार दाखल झाली होती. त्यामुळे आरोपी घाबरले. त्यांनी एका जुनाट घराजवळ झुडपामध्ये तो टाकून देत पळ काढला. पण नागपूर पोलिसांनी तांत्रिक तपास करत अवघ्या काही तासातच तिघांना अटक केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world