Nagpur Violence : नागपूर हिंसाचारानंतर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने 51 दंगलखोरांच्या मालमत्ता कराच्या नोंदीची चौकशी सुरू केली आहे. नागपूर येथे 17 मार्च रोजी दोन दुकानांचे भाडेपट्टे रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. फहीम खान आणि हमीद इंजीनिअर यांच्यासह दंगलीतील 51 आरोपींना अटक केल्यानंतर ही कारवाई केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नागपूर महापालिकेने मोमीनपुरा येथील हैदरी रोड कॉम्प्लेक्समधील दोन दुकानांचे भाडेपट्टे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने शेख असराफी (फारुकी) यांना भाड्याने दिलेली 12 क्रमांकाची आणि शाहीन हमीद यांना 13 क्रमांकाची दोन दुकाने भाड्याने दिली होती. ते दोन्ही या प्रकरणी आरोपी आहेत.
दुकानाच्या या गाळ्यांमध्ये युथ फोर्स अँड चॅरिटेबल क्लिनिक अँड पॅथॉलॉजी या नावाने इंडियन मुस्लिम असोसिएशन काम करत असल्याचे पोलिसांना आढळले. दंगलीतील आरोपींनी हे दुकान वापरल्याची बाब तपासात निष्पन्न झाल्यानंतर या दुकांनाना टाळे लावण्यात आले आहे.
दंगलीतील आरोपी हमीद यांची पत्नी शाहीन हमीद यांना महापालिकेने दुकान क्रमांक 13 भाडेपट्टे करारावर दिले होते. त्यांनी तीन वर्षांपासून भाडेपट्ट्याची देयके थकवली असून 84 हजार रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. महानगर पालिकेची मालमत्ता भाडेपट्टावर घेऊन ती आणखी दुसऱ्याला भाड्याने देणे हा कराराचा भंग आहे. त्यामुळे भाडेपट्टा रद्द केला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.