मुंबईतील 8 रेल्वे स्टेशनची नावे बदलणार, विधानपरिषदेत ठराव मंजूर

विधिमंडळाच्या मान्यतेने आता हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे.मध्य रेल्वेवरील 2,  पश्चिम रेल्वेवरील 2 आणि हार्बर रेल्वेवरील 4 स्थानकाचा यात समावेश आहे. 

Advertisement
Read Time: 1 min

मुंबईतील 8 रेल्वे स्टेशनची नावे बदलण्याचा ठराव आज विधानपरिषदेत मंजूर झाला आहे. विधिमंडळाच्या मान्यतेने आता हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे.मध्य रेल्वेवरील 2,  पश्चिम रेल्वेवरील 2 आणि हार्बर रेल्वेवरील 4 स्थानकाचा यात समावेश आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मध्य रेल्वेवरील करीरोड रेल्वे स्थानकाचं नाव बदलून लालबाग तर सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबादेवी आणि चर्नीरोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक करण्यात येणार आहे. 

(नक्की वाचा- मुंबईकरांना महागाईचा दणका; CNG आणि PNG च्या दरात वाढ)

हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळाचौकी , सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी, डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाचं नाव माझगाव आणि किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक करण्याची शिफारस या ठरावात करण्यात आली आहे.

(नक्की वाचा- BMW Hit And Run : शिवसेना नेत्याच्या मुलाभोवतालचा फास आवळला, बिलमधून मोठा खुलासा)