Nandgaon Vidhan Sabha: नाशकात महायुतीचं 'बळ' घटलं, पुतण्याच्या बंडखोरीमुळे होणार वांदे!

Sameer Bhujbal : समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. येत्या 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

महायुतीला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. छगन भुजबळ यांचे पुतणे, माजी खासदार समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.

समीर भुजबळ येत्या 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. समीर भुजबळ आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुंबई अध्यक्षपदाचा देखील राजीनामा दिला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समीर भुजबळ महायुतीतून नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र शिवसेना शिंदे गटाने पहिल्याच यादीत विद्यमान आमदार सुहास कांदे यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.

त्यानंतर समीर भुजबळ शरद पवार गटातून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात होता. मात्र शिवसेना ठाकरे गटाने गणेश धात्रक यांना येथून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे समीर भुजबळ यांना येथून बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

(नक्की वाचा-   मुख्यमंत्री शिंदेंची मध्यस्थी, अंबरनाथमधला पेच सुटला? किणीकर -वाळेकर वाद मिटला)

नांदगावमधील परिस्थिती अतिशय भयानक - भुजबळ

समीर भुजबळ यांना पत्रकार परिषद घेत म्हटलं की, नांदगावमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे. पंकज भुजबळांनी 10 वर्षात केलेल्या विकासकामांना खीळ बसली आहे. येत्या 28 तारखेला नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज भरणार आहे. 28 तारखेला भयमुक्त नांदगाव हे मिशन हाती घेऊन आम्ही नांदगावला जाणार आहोत. 

(नक्की वाचा- निलेश राणेंबाबत वैभव नाईक यांचे मोठ वक्तव्य, राणे पलटवार करणार?)

नांदगाव विकासाच्या दृष्टीने पुढे न्यायचा असेल तर इथला दहशतवाद संपवावा लागेल. तुम्हीच हे करू शकता असे इथल्या लोकांनी सांगितलं. म्हणून मी इथून निवडणूक लढवतोय. मी जनतेला मदतीचा हात देण्यासाठी इथे आलो आहे. जनतेनं देखील मला साथ द्यावी. विद्यमान आमदार एखाद्या गरीबाचं साधं रेशन कार्ड देखील काढून देत नाही. भुजबळांची संमती आहे की नाही हे मला माहीत नाही, मी माझ्या लोकांसाठी इथे आलो आहे. मी अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहे, असं समीर भुजबळ यांनी म्हटलं. 

Topics mentioned in this article