प्रशांत जव्हेरी, नंदुरबार
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. पक्षांसोबत नेत्यांनी देखील मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी ताकद वाढल्याचं चित्र आहे. म्हणून महाविकास आघाडीत विधानसभेसाठी इच्छूकांचं इनकमिंग सुरु झालं आहे. नंदुरबारच्या शहादा येथेही अशीच स्थिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शहादा तळोदाचे आमदार राजेश पाडवी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सध्या नंदुरबार जिल्ह्यात रंगल्या आहेत. मात्र मी भाजप सोडून कुठल्याही पक्षात जाणार नाही, अशी प्रतिक्रिया आमदार राजेश पाडवी यांनी दिली आहेत. मात्र असं असलं तरी राजेश पाडवी काँग्रेसमध्ये जातील असं कुजबूज सुरु आहे.
(नक्की वाचा : मुलगा जय विधानसभा निवडणूक लढवणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर )
राजेश पाडवी यांची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली असल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चा आमच्या पक्षातील काही लोकांनी उपस्थित केल्या आहेत. मला पक्षाने अनेक संधी दिल्या आहेत आणि या संधीचा मी फायदा देखील पक्षाला करून दिला आहे. मी शेवटपर्यंत भाजप सोडून कुठेही जाणार नाही. आमच्या पक्षातील काही विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या लोकांकडून या बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र मी भाजपमध्ये राहणार असल्याचे राजेश पाडवी यांनी सांगितले.