जाहिरात
Story ProgressBack

कोकण पदवीधरसाठी भाजपचा उमेदवार कोण? राणेंनी थेट नाव घेतले

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे उमेदवार कोण असणार त्यांचे नावच जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे लोकसभेसाठी आघाडी आणि राज्यात मात्र बिघाडी असे चित्र निर्माण होत आहे.

Read Time: 2 mins
कोकण पदवीधरसाठी भाजपचा उमेदवार कोण? राणेंनी थेट नाव घेतले
सिंधुदुर्ग:

कोकण पदवीधर मतदार संघातून महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत अजूनही अस्पष्टता आहे. राज ठाकरे यांच्या मनसेने आधीच अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र ते महायुतीचे उमेदवार असतील की नाही हे अजूनही निश्चित नाही. भाजप नेते आशिष शेलार यांनीही मनसेला शुभेच्छा दिल्या आहे. त्यात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे उमेदवार कोण असणार त्यांचे नावच जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे लोकसभेसाठी आघाडी आणि राज्यात मात्र बिघाडी असे चित्र निर्माण होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )  

मनसेने लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र लोकसभेनंतर लगेचच विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत मनसेने थेट आपला उमेदवार कोकण पदवीधर मतदार संघातून जाहीर केला. त्यामुळे महायुतीत नक्की काय सुरू आहे याची चर्चा सुरू झाली. उमेदवार घोषीत केल्यानंतर आशिष शेलार यांनी पहिली प्रतिक्रीया दिली होती. कोकण पदवीधरची जागा ही भाजपची आहे. त्यामुळे भाजप ही जागा लढवेल असे सांगताना त्यांनी मनसेला शुभेच्छा दिल्या होत्या. 

हेही वाचा - पराभवाची की विजयाची हॅटट्रिक? सिंधुदुर्ग-रत्नागिरीत मतदार कोणाच्या बाजूने?

त्यात आधा मनसेचे टेन्शन अजून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वाढवले आहे. त्यांना कोकण पदवीधर मतदार संघातून महायुतीचा कोण उमदेवार असेल असे विचारले असता त्यांना त्याचे थेट नाव घेतले. पक्षाने आम्हाला उमेदवार कोण असेल हे स्पष्ट केले आहे. त्यानुसार निरंजन डावखरेच भाजपचे उमेदवार असतील. त्यांचे नाव पक्षांने आम्हाला कळवले आहे. त्यामुळे दुसरे कुणाचे काही असेल त्याबाबत आपल्याला कल्पना नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय मनसेच्या उमेदवारीकडेही कानाडोळा केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासाठी कणकवलीत सभा घेतली होती. त्यामुळे कोकण पदवीधरसाठी ते काय भूमीका घेतात याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती.

हेही वाचा - राय'गड' तटकरेंचा का की गितेंचा? जनमत कोणाच्या बाजूने?

दरम्यान महायुतीत उमेदवार कोण असावा याबाबत घोळ सुरू आहे. मनसेने उमेदवार जाहीर केला आहे. निरंजन डावखरे यांना भाजप मैदनात उतरवणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे संजय मोरे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहे.  अशा वेळी महाविकास आघाडीने मात्र कोकण पदवीधरसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसचे रमेश किर हे इथे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील.  

   

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
भाचा- मामी अनैतिक संबंध अन् खून, कंडोमच्या मदतीने आरोपीचा छडा
कोकण पदवीधरसाठी भाजपचा उमेदवार कोण? राणेंनी थेट नाव घेतले
Threat to kill BJP MLA Sanjay Savkare with his family, what is the real reason?
Next Article
भाजपच्या आमदाराला परिवारासह जीवे मारण्याची धमकी, नेमकं कारण काय?
;