निलेश वाघ, मनमाड
नाशिकच्या दिंडोरी परिसरात एसटी बस आणि कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. दिंडोरीच्या अक्राळे फाट्यावरील ही अपघाताची घटना घडली आहे. अपघातानंतर बस आणि कारने पेट घेतला. या अपघतात कारमधील पाच जणांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघांना वाचवण्यात यश आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एसटी बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. तर जखमींवर जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कार जळून खाक झाली आहे, तर बसचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
(नक्की वाचा- नाशिकमध्ये मुसळधार; धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा)
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी-वणी रस्त्यावर एसटी बस आणि बोलेरो गाडीची समोर-समोर धडक झाली. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. कारने पेट घेतल्यानंतर स्थानिकांनी कसबसं तिघांना कारमधून बाहेर काढलं. मात्र दोघांना बाहेर काढण्यात अपयश आलं. त्यातच दोघांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेनंतर दिंडोरी-वणी रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
( नक्की वाचा : 'माझ्या नादी लागलात तर मी सोडत नाही', फडणवीसांचा थेट इशारा )
नगर-कल्याण महामार्गावर अपघातात दोन महिलांचा मृत्यू
अहमदनगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे लक्झरी बस आणि कारचा अपघात झाला. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. आळेफाट्यावरुन कल्याणच्या दिशेने जाणारी बसची समोरुन येणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. रिया गायकर, कुसुम शिंगोटे असे अपघात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.