जाहिरात

नाशिकमध्ये मुसळधार; धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Nashik Rains News : नाशिक जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येत आहे.

नाशिकमध्ये मुसळधार; धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

प्रांजल कुलकर्णी / किशोर बेलसारे, नाशिक

नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गोदावरी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. काल दिवसभरात 161 मिमी तर आज सकाळपासून 72 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अतिवृष्टीमुळे त्र्यंबकेश्वर शहरात मुख्य रस्त्यांना नदीचे रूप आले आहे. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. विशेष म्हणजे उद्यापासून पवित्र श्रावण महीन्याला सुरुवात होणार असून त्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आणि छोटे मोठ्या व्यावसायिकांची तयारी, लगबग सुरु असतांना पूर्वसंध्येला पावसामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. परराज्यातून आलेले अनेक भाविकही पावसामुळे अडकून पडले आहेत..

गंगापूर धरण 80 टक्के भरले

नाशिक जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात येत आहे. रविवारी दुपारी 12 वाजता दारणा धरणातून 22966 क्यूसेक, भावली धरणातून 1,218 क्यूसेक, कडवा धरणातून 8,298 क्यूसेक, भाम धरणातून 4,370 क्यूसेक, पालखेड धरणातून 5,570 क्यूसेक तर गंगापूर धरणातून 4000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून 44 हजार 768 क्यूसेकने पाणी मराठवाड्याच्या दिशेने सोडण्यात येते आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

(नक्की वाचा - Pune News : खडकवासला धरणातून 45000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, लष्कर आणि NDRF अलर्ट मोडवर)

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने विसर्गात टप्प्याटप्प्याने होणार वाढ आहे. गोदाकिनारी असलेल्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. पूर बघण्यासाठी गर्दी करू नका, धोकादायक ठिकाणी जाऊ नका. आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास 02532571872 या क्रमांकावर संपर्क साधा, असं आवाहन  नाशिक महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांनी नागरिकांना केलं आहे. 

(नक्की वाचा- Shivsena Vs BJP : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपली)

नाशिकमधील पावसाने मराठवाड्याला दिलासा

नाशिक धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा मोठा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने जात आहे. गोदावरी पात्रात तब्बल 50 हजार क्यूसेकपेक्षा अधिकच्या पाण्याची आवक सुरु आहे. गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाल्याने ही पाणी आता जायकवाडी धरणाच्या दिशेने जात आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: