Nashik News: नाशिक हादरलं! दोन मुलींचे वेगवेगळ्या ठिकाणांहून अपहरण, पालक चिंतेत

Nashik News: नाशिकच्या पंचवटी आणि भगूर परिसरातून दोन मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. अज्ञात इसमांनी आमिष दाखवून फूस लावून या मुलींना पळवून नेल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल वाघ, नाशिक

नाशिक शहरात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या 24 तासांत शहरातील दोन वेगवेगळ्या भागांतून दोन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्याने पालकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

नाशिक शहर आणि परिसरातून दोन मुलींना अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एक घटना पंचवटीतील नवनाथनगर येथे तर दुसरी घटना भगूर परिसरात घडली आहे. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी अपहरणाचे गुन्हे दाखल केले असून तपास सुरू केला आहे.

पहिली घटना: पंचवटी (नवनाथनगर)

पंचवटीतील नवनाथनगर परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे. फिर्यादी यांची मोठी मुलगी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घरातून बाहेर गेली होती. मात्र, ती बराच वेळ झाली तरी परतली नाही. मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(नक्की वाचा-  Crime News: नाशिक हादरलं! विवाहितेचा 2 लाखांत 'सौदा'; इव्हेंटच्या नावाखाली नेलं अन् पुढे भयंकर घडलं)

दुसरी घटना: भगूर (देवळाली कॅम्प परिसर)

अपहरणाची दुसरी घटना रात्रीच्या सुमारास भगूर येथे घडली, जी अत्यंत धक्कादायक आहे. ही मुलगी रात्री 11 वाजेच्या सुमारास घराबाहेर पडली. "मी कुत्र्याला पोळी देऊन येते," असे तिने आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते. परंतु, ती पुन्हा घरी परतलीच नाही. बराच शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने पालकांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Jalgaon News: जळगावात ठाकरे गटाला खिंडार! बडा नेता हाती घेणार 'धनुष्यबाण'; 6 मार्चला जाहीर प्रवेश)

एकाच दिवसात शहराच्या दोन टोकांना घडलेल्या या घटनांमुळे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, संशयास्पद व्यक्तींची चौकशी केली जात आहे. दोन्ही प्रकरणांत मुलींना फूस लावून पळवून नेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रात्रीच्या वेळी किंवा अल्प कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुलांकडे पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 

Topics mentioned in this article