Nashik Crime News: दुसऱ्या मुलांशी बोलत असल्याच्या राग! मित्रानेच मैत्रिणीला क्रूरपणे संपवले

Nashik News: नाशिकच्या सारूळ जंगलात सापडलेल्या मुलीच्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा झाला आहे. अकोल्यातून बेपत्ता झालेल्या या मुलीची तिच्याच मित्राने संशयावरून हत्या केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल वाघ, नाशिक

Nashik Crime News: नाशिकच्या सारूळ परिसरात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले असून, मुलीच्या मित्रानेच हा खून केल्याची कबुली दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या कुटुंबाच्या परिचयाचे होते.

अकोल्यातून झाली होती बेपत्ता

मुलगी मूळची बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील रहिवासी होती आणि अकोला येथे अकरावीत शिक्षण घेत होती. ती बेपत्ता झाल्याची तक्रार अकोला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांचा संशय तिच्या मित्रावर बळावला.

(नक्की वाचा-  Badlapur News: बदलापूर हादरलं! पैशांचे आमिष दाखवून महिलांसोबत भयंकर कृत्य! 3 महिलांना अटक)

खुनाचे कारण काय?

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा नाशिकमधील नामांकित संदीप फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे. पीडित मुलगी दुसऱ्या मुलांशी बोलते, असा संशय आरोपीला होता. याच रागातून त्याने तिचा काटा काढण्याचे ठरवले. बुलढाण्यावरून नाशिककडे येतानाच वाटेत मुलीची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह सारूळ येथील दुर्गम जंगलात फेकून देण्यात आला.

(नक्की वाचा-  Sambhajinagar Crime: मुलीचा बोचरा प्रश्न अन् रागात आईने केली हत्या; गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचं गुढ उलगडलं!)

दोन आरोपींना अटक

पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपीसह त्याच्या एका साथिदाराला ताब्यात घेतले आहे. दोन्ही कुटुंबांमध्ये कौटुंबिक संबंध असल्याने या घटनेमुळे सिंदखेड राजा परिसरातही मोठी खळबळ उडाली आहे. "प्रेम प्रकरणातून आणि संशयातून ही हत्या झाली असून, पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत," असे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
 

Advertisement
Topics mentioned in this article