जाहिरात

Badlapur News: बदलापूर हादरलं! पैशांचे आमिष दाखवून महिलांसोबत भयंकर कृत्य! 3 महिलांना अटक

Badlapur Crime News: बदलापूरमध्ये गरजू महिलांना पैशांचे आमिष देऊन त्यांच्या अंडाशयाची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह तीन महिलांना अटक करण्यात आली आहे.

Badlapur News: बदलापूर हादरलं! पैशांचे आमिष दाखवून महिलांसोबत भयंकर कृत्य! 3 महिलांना अटक
AI Photo (Google Gemini)

Badlapur Crime News: बदलापूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारा आणि महिलांच्या आरोग्याशी खेळणारा एक अत्यंत भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. गोरगरीब आणि गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयाची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा बदलापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जोवेली भागातील नॅनो सिटी येथील एका इमारतीत हे धक्कादायक रॅकेट सुरू होते. बदलापूर पूर्व पोलिसांनी बदलापूर ग्रामीण रुग्णालयाचे पथक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या मदतीने ही कारवाई केली.

कसं चालवलं जात होतं रॅकेट?

मुख्य सूत्रधार सुलक्षणा गाडेकर हिच्या घरातून हे रॅकेट चालवले जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी आर्थिक अडचणीत असलेल्या गरजू महिलांना हेरून त्यांना 25 ते 30 हजार रुपयांचे आमिष दाखवत असे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुलक्षणा गाडेकर या महिलांच्या गर्भाशयात स्त्रीबीजांची वाढ करण्यासाठी स्वतः इंजेक्शन देत असे. बीजांडांची वाढ झाल्यानंतर या महिलांना काही आयव्हीएफ (IVF) सेंटर्समध्ये पाठवले जायचे, जिथे डॉक्टरांच्या मदतीने बीजांडे काढून त्यांची विक्री केली जात असे.

(नक्की वाचा-  Nagpur News: बारावीचे पेपर्स फुटले! 2 विषयांचे पेपर परीक्षेपूर्वीच WhatsApp वर, विद्यार्थिनीची एक चूक अन्...)

मोबाइलमधील पुराव्यांनी पोलीस चकीत

आरोपी सुलक्षणा गाडेकर हिच्या मोबाइलमध्ये पोलिसांना धक्कादायक पुरावे सापडले आहेत. यामध्ये महिलांच्या खोट्या नावांची प्रतिज्ञापत्रे आणि सोनोग्राफी रिपोर्ट्स सापडले आहेत.  बीजांड विक्रीशी संबंधित पैशांच्या व्यवहाराचे फोटो आणि मेसेजेस आहेत. गर्भधारणेसाठी लागणारी आणि बीजांड वाढवणारी संशयास्पद इंजेक्शन पोलिसांना घटनास्थळी मिळून आली.

(नक्की वाचा-  Sambhajinagar Crime: मुलीचा बोचरा प्रश्न अन् रागात आईने केली हत्या; गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचं गुढ उलगडलं!)

20 हून अधिक महिलांचे शोषण झाल्याचा संशय

उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, "आतापर्यंत 20 हून अधिक महिलांचा या कामासाठी वापर झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुलक्षणा गाडेकर (44), अश्विनी चाबुकस्वार (29) आणि मंजुषा वानखेडे (46) या तीन महिलांना अटक करण्यात आली आहे." या प्रकरणात काही बड्या डॉक्टरांचे किंवा आयव्हीएफ केंद्रांचे हात असण्याची शक्यता असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com