Nashik MLC Election: नाशकात सर्वात मोठा उलटफेर! गोकुळ गितेंचा 'गनिमी कावा'; नरेंद्र दराडेंचा पराभव करत विजयी

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. निवडणुकीतून माघार घेतल्याचे मानले जाणारे अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते विजयी झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik MLC Election: राज्यभरात कमालीची उत्सुकता निर्माण केलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. मतमोजणीच्या अखेरच्या क्षणी मोठा ट्विस्ट याठिकाणी पाहायला मिळाला आहे. भाजपचे बंडखोर आणि आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी झाले आहे. गोकुळ गीते 357 मतांनी विजयी झाले. तर नरेंद्र दराडे यांना 248 मते मिळाली. 

गोकुळ गिते यांनी थेट मतमोजणी केंद्रावर एन्ट्री मारत आपण 100 टक्के निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. गोकुळ गिते यांनी ऐनवेळी घेतलेल्या या भूमिकेमुळे महायुतीचे (शिंदे गट) अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी आपला विश्वासघात झाल्याची बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. 

Advertisement

एकूण मतदान -618

  • अवैध मते - 13
  • वैध मते - 605  
  • कोटा - 303
  • गोकुळ गिते - 357 मते
  • महायुती नरेंद्र दराडे - 248  मते
  • प्रसाद हिरे -00

(नक्की वाचा- विधान परिषद निवडणूक अपडेट्स, सर्व 11 जागांचे निकाल समोर! महायुतीचा महाविजय)

"मी माघार घेतलीच नाही"

काही दिवसांपूर्वी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर गोकुळ गिते यांनी माघार घेतल्याचे बोलले जात होते. मात्र, तांत्रिकदृष्ट्या मतपत्रिकेवर त्यांचे नाव कायम होते. "मतदारांनी मला शंभर टक्के मतदान केले असून त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवेन. मी माझा वैयक्तिक प्रचार थांबवला होता, मात्र माझ्या कार्यकर्त्यांनी बॅकग्राउंडला पूर्ण यंत्रणा राबवली आहे. मी माघार घेतलेली नाही, तुम्ही तो शब्द वापरू नका. मीच निवडून येणार", असं गोकुळ गिते यांनी म्हटलं. 

माझा विश्वासघात झाला

निकालाचं वातावरण फिरल्यातं दिसताच नरेंद्र दराडे नाराज होत बाहेर पडले. बाहेर पडताना प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी विश्वासघात झाल्याची प्रतिक्रिया दिली.  मी आता काही बोलणार नाही, मात्र दुपारी निकाल पूर्णपणे हाती आल्यानंतर सर्व काही स्पष्ट करेन", असं देखील नरेंद्र दराडे यांनी म्हटलं. 
 

Topics mentioned in this article