Ashok Kharat News: महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणुकीप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन खरात' याच्या काळ्या साम्राज्याचे धागेदोरे आता त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचले आहेत. खरातची मुलगी तृप्तबाला खरात हिची आज विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी होण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान तृप्तबालाच्या नावावर जवळपास 100 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
मुलगी आणि पत्नीच्या नावे मालमत्तेचा डोंगर
रिपोर्ट्सनुसार, अशोक खरातची मुलगी तृप्तबाला खरातच्या नावे जवळपास 100 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या संपत्तीमध्ये मोकळे प्लॉट्स, आलिशान फ्लॅट्स आणि बेनामी मालमत्तेचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज होणाऱ्या तृप्तबालाच्या चौकशीतून या बेनामी संपत्तीचे आणि आर्थिक व्यवहारांचे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणामुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून खरात कुटुंबाच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे.
(नक्की वाचा: Ashok Kharat Case: अशोक खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? चौकशीत खळबळजनक खुलासा)
पत्नी कल्पना खरात अद्याप फरार
दुसरीकडे अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत. विशेष म्हणजे कल्पना ही गेल्या 20-22 वर्षांपासून आपल्या माहेरच्यांच्या संपर्कात नसल्याचेही माहिती समोर आलीय.
Photo Credit: NDTV Marathi
VIDEO: Ashok Kharat ची मुलगी तृप्ताबाला ही देखील SIT च्या रडारवर, पत्नी कल्पना आणि मुलगा हर्षवर्धन फरार