- सप्तशृंगी गडावरून परतताना गणपती पॉइंटजवळ इनोव्हा कार खोल दरीत कोसळली
- या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती कळवण महसूल विभागाकडून समोर आली आहे
- अपघात झालेल्या गाडीमध्ये सहा व्यक्ती होत्या आणि त्यांचे सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे
निलेश वाघ
सप्तशृंग मातेचे दर्शन घेवून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सप्तशृंगी गडावरून परताना भाविकांची इनोव्हा कार खोल दरीत कोसळली. हा अपघात गणपती पॉइंटजवळ घडला. ही गाडी संरक्षण कथडा तोडून खोल दरीत कोसळली. दर्शन घेऊन परत जात असताना हा अपघात घडला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून मदत कार्य सुरू करण्यात आलं होतं.
कार खोल दरी असल्याने मदत कार्यात अडचण येत होती. सप्तश्रृंगी गड घाटातील monkey point या ठिकाणी Innova गाडीला अपघात झाला. ही गाडी पिंपळगाव येथील आही. गाडी घाटातून सुमारे 600 फूट दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. या गाडीमध्ये 6 व्यक्ती होत्या. त्या सर्वांचाच या अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोरय येत आहे. कळवण महसूल विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
या अपघातात पुढील व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
- 1)किर्ती पटेल 50
- 2)रशिलापटेल 50
- 3)विठ्ठल पटेल 65
- 4)लता पटेल 60
- 5)पचन पटेल 60
- 6)मनी बेन पटेल 70
सर्व मृत पिंपळगाव बसवंत येथील रहिवाशी असल्याचं समोर आलं आहे. या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होतं. हे काम करताना रात्र झाली होती. त्यामुळे मदत कार्यात अडचण येत होती. या अपघाताने हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय भाविकांना या अपघातात जीव गमवावा लागल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर ही कोसळला आहे. प्रथमदर्शनही सर्व मृत हे एकाच कुटुंबातील असल्याचं वाटत आहे. मृतांमध्ये सर्वांचे वय हे 50 पेक्षा जास्त आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world