TCS Nashik Case: वरिष्ठांचा छळ आणि लैंगिक शोषण का सहन केलं? एका पीडितेबाबत मन सुन्न करणारी माहिती समोर

Nashik TCS Case: नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या दबावाचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल वाघ, नाशिक

नाशिक येथील नामांकित टीसीएस (TCS) कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाचे आणि धर्मांतराचे जे प्रकरण समोर आले आहे, त्यात आता अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका पीडित तरुणीने आपल्या कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हा सर्व छळ सहन केल्याचे सूत्रांकडून समजते.

वडिलांच्या उपचारामुळे पीडितेची हतबलता

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, एका पीडितेचे वडील कॅन्सरने आजारी असून ते अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांच्या किमोथेरपीसाठी लागणारी महागडी औषधे आणि पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी पीडितेला नोकरीची अत्यंत गरज होती. घरात अन्नाचा कण नसताना आणि कुटुंबाची उपासमार होत असताना, या हतबलतेचा फायदा घेत तिला मानसिक छळ आणि अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Bhendwal Bhakit: राज्यात पाऊस कसा असेल? राजकीय उलथापालथ होणार? भेंडवळच्या भाकितानं चिंता वाढली)

धर्मांतराचा छुपा अजेंडा?

दुसऱ्या एका पीडितेबाबतही धक्कादायक बाब समोर आली आहे. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर असल्याने, नोकरी टिकवण्याच्या नावाखाली तिला धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. सूत्रांनी याला 'कॉर्पोरेट जिहाद' असे संबोधले असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाची एन्ट्री

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) स्वतः दखल घेतली आहे. आयोगाच्या पथकाने पीडितांची आपबिती जाणून घेतली आहे. रविवारी महिला आयोगाच्या पथकाने टीसीएस कंपनीत जाऊन तब्बल दीड तास सखोल चौकशी केली. कंपनीतील पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, विविध विभाग, कॅन्टीन आणि वेटिंग रूमची बारकाईने पाहणी करण्यात आली. आज सलग तिसऱ्या दिवशी महिला आयोगाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून अधिक पुरावे गोळा केले जात आहेत.

(नक्की वाचा-  Mumbai News: मुंबईत अंड्यावर येणार 'एक्सपायरी डेट'? खराब-सडलेली अंडी विकणाऱ्यांवर चाप बसणार)

काय आहे 'कॉर्पोरेट जिहाद' प्रकरण?

कंपनीतील काही वरिष्ठ कर्मचारी महिला कर्मचाऱ्यांवर धर्मांतरासाठी दबाव टाकत होते आणि त्यांना लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागत होते, असा आरोप आहे. या प्रकरणाने नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली असून कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.