Viral VIdeo : 'मराठी भेळवाला' कसा पोहोचला 'शिवतीर्थ'वर? भेळ खाऊन राज ठाकरे म्हणाले...

Mumbai Cha Bhelwala Meet Raj Thackeray: शर्मिला ठाकरे यांना याबाबत म्हटलं की, माझी मेत्रिण वंदना गुप्ते यांनी मला सागर गोरडे यांनी बनवलेली भेळ एकदा खाण्याचा सल्ला दिला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News: नवी मुंबईच्या एका भेळवाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होता आहे. सागर गोरडे नावाच्या या भेळवाल्याने 'शिवतीर्थ' येथे जात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना भेळ खाऊ घातली आहे. राज ठाकरे यांना भेळ भरवण्याचं अनेक वर्षांपासून माझं स्वप्न पूर्ण झाल्याचं सागरने म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या घरी कसा पोहोचला?

नवी मुंबईत प्रसिद्ध असलेल्या हा भेळवाला राज ठाकरे यांच्या घरी कसा पोहोचला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शर्मिला ठाकरे यांना याबाबत म्हटलं की, माझी मेत्रिण वंदना गुप्ते यांनी मला सागर गोरडे यांनी बनवलेली भेळ एकदा खाण्याचा सल्ला दिला होता. सहा वर्षांपूर्वी मी ही भेळ खाल्ली होती, मात्र मला लक्षात नव्हते.

अखेर ते स्वत: राज साहेबांना भेळ देण्यासाठी घरी आले आहेत. त्यांची भेळ अप्रतिम आहे. मी तुम्हाला आमच्या घरी एखाद्या कार्यक्रमासाठी नक्की बोलवेन, तेव्हा नक्की या, असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं. राज ठाकरे यांनी देखील भेळ स्वादिष्ट असल्याची दाद दिली. त्यामुळे सागर यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

पाहा VIDEO

Advertisement

(नक्की वाचा- Indurikar Maharaj: इंदोरीकर महाराज कीर्तन सोडणार? मुलीच्या कपड्यांवर ट्रोलिंगमुळे मोठ्या निर्णयाचे संकेत)

सागर यांनी काय म्हटलं?

सागर गोरडे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हटलं की, "ग्रेट भेट राजसाहेब ठाकरे, जेव्हा मी हा 10 वर्षांपूर्वी भेळचा छोटासा व्यावसाय चालू केला होता. तेव्हा मनात विचार आला होता की मी बनवलेली ओली मटकीभेळ, सुकी मटकीभेळ राजसाहेब ठाकरे यांना देऊ शकतो का? असा विचार केला."

"तो विचार आज पूर्ण झाला. खरंच आज शिवतीर्थ या निवासस्थानी राजसाहेबांना आणी वहिनीसाहेबांना भेटून अविस्मरणीय अनुभव आला. राजसाहेब आणि वहिनीसाहेब व संपूर्ण परिवाराने ओली मटकी भेळ, सुकी मटकी भेळ अशा दोन्ही प्रकारच्या भेळ खाऊन मनसोक्त भेळीचा आस्वाद घेतला."

Topics mentioned in this article