Navi Mumbai: तरुणाची हत्या अन् मृतदेहसोबत 191 किमीचा प्रवास, हवालदाराच्या कृत्याने पोलीसही चक्रावले

Navi Mumbai News: नवी मुंबईतील एका पोलीस हवालदाराने पत्नीच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह साताऱ्यातील लोणंद येथे शेतविहिरीत फेकून दिला. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे या थरारक हत्येचा छडा लावला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Navi Mumbai Crime News: नवी मुंबई पोलीस दलातील एका हवालदाराने आपल्या पत्नीच्या कथित प्रियकराची हत्या करून त्याचा मृतदेह तब्बल 191 किलोमीटर लांब नेऊन जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत या गुन्ह्याचा उलगडा केला असून आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या एका पोलीस हवालदाराने रागाच्या भरात खुनासारखे गंभीर पाऊल उचलल्याने नवी मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 

कसा उघडकीस आला गुन्हा?

रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार भिसे यांनी आपल्या पत्नीच्या कथित प्रियकराची हत्या करून, पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह सातारा जिल्ह्यातील लोणंदपर्यंत नेला. 6 फेब्रुवारी रोजी खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील एका शेतविहिरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रावून टाकणाऱ्या दिशेला गेला. 

(नक्की वाचा-  Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या अपघाताचं नवीन CCTV Footage, विमानतळावर नेमकं काय घडलं?)

मृत व्यक्ती ही नवी मुंबईतील कळंबोली येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान पोलिसांना हवालदार भिसे यांच्यावर संशय आला. त्यांच्या पत्नीचे मृत व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा वाद सुरू झाला होता. भिसे याने संबंधित व्यक्तीला बोलावून त्याची हत्या केली आणि त्यानंतर जो प्रकार केला तो एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकणारा होता.

मृतदेहासोबत 191 किलोमीटरचा प्रवास

हत्या केल्यानंतर आरोपी हवालदाराने मृतदेह कारमध्ये चालकाच्या शेजारच्या सीटवर बसवला. कोणाला संशय येऊ नये म्हणून मृतदेह जिवंत माणसाप्रमाणे बसवून त्याने नवी मुंबई ते सातारा असा 191 किलोमीटरचा प्रवास केला. लोणंदमधील सुखेड परिसरात पोहोचल्यावर त्याने मृतदेह एका विहिरीत टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत राहिल्याने स्थानिकांच्या लक्षात हा प्रकार आला.

Advertisement

(नक्की वाचा-  UP News: रात्री झोपी गेलेली तरुणी बनली 'नागीण'! सकाळी बेडरुमधील दृश्य पाहून अख्ख गाव हादरलं)

सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनमुळे हत्येचा छडा

लोणंद पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तांत्रिक तपास केला. आरोपी आणि मृत व्यक्तीचे मोबाईल लोकेशन एकाच मार्गावर आढळले. महामार्गावरील टोल नाके आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीच्या वाहनाचा मागोवा घेतला. संशय बळावल्यानंतर नवी मुंबईतून हवालदार भिसे याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 

Topics mentioned in this article