जाहिरात

Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या अपघाताचं नवीन CCTV Footage, विमानतळावर नेमकं काय घडलं?

Ajit Pawar Plane Crash New CCTV Footage: रोहित पवारांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांच्या विमान अपघाताचा एक नवीन व्हिडीओ देखील सर्वांसमोर आणला. विमान अपघाताचे हे नवीन सीसीटीव्ही फुटेज अंगावर शहारे आणणारे आहे.

Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या अपघाताचं नवीन CCTV Footage, विमानतळावर नेमकं काय घडलं?

Ajit Pawar Plane Crash New CCTV Footage: अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अजितदादांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? हा अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे देशाला पडलेला प्रश्न आहे. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार यांनी केला. यासाठी रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अनेक तांत्रिक प्रश्न उपस्थित केले. यामुळे या अपघाताभोवतीचे संशयाचे धुके अधिक गडद झाले आहे.

रोहित पवारांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांच्या विमान अपघाताचा एक नवीन व्हिडीओ देखील सर्वांसमोर आणला. विमान अपघाताचे हे नवीन सीसीटीव्ही फुटेज अंगावर शहारे आणणारे आहे. बारामती विमानतळावरील सीसीटीव्हा कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे.  

पाहा VIDEO

व्हिडीओमध्ये दिसत आहे की त्या दिवशी बारामती विमानतळ परिसरात दाट धुकं होतं.  अजितदादांचे विमान वेगाने जमिनीवर आदळते आणि क्षणात आगीचा भडका उडताना व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. या घटनेने केवळ अपघात की तांत्रिक निष्काळजीपणा, असे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

(नक्की वाचा-  Ajit Pawar AI VIDEO: "खरंच मला करमत नाही रे इकडे..." अजितदादांच्या आवाजातील हृदयस्पर्शी AI व्हिडिओ)

रोहित पवार यांनी उपस्थित केलेले 5 महत्त्वाचे प्रश्न

  1. विमानात नेमका काय बिघाड झाला होता आणि हे पूर्णपणे 'मेकॅनिकल फेल्युअर' होते का?
  2. उड्डाणापूर्वी विमानाची रीतसर तपासणी कोणी केली होती? ती करणारे कर्मचारी कोण होते?
  3. विमानाचा 'टेक लॉग' आणि 'एअरवर्थी रिपोर्ट' सध्या कुठे आहे? तो सार्वजनिक का केला जात नाही?
  4. विमानाचे 'रुटीन लाईन मेंटेनन्स' झाले होते का? हॅन्गरचे सीसीटीव्ही फुटेज कुठे गायब झाले?
  5. विमानाचा शेवटचा 'हेवी बेस मेंटेनन्स' कधी झाला होता आणि त्याचा अधिकृत अहवाल काय सांगतो?
     

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com