नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यावसायिक उड्डाण चाचणी यशस्वी झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. या यशस्वी चाचणीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिली व्यावसायिक विमान उड्डाण मान्यता चाचणी यशस्वीपणे पार पडली, हा समस्त महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण आहे. असं फडणवीस म्हणाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इंडिगो A-320 या पहिल्या व्यावसायिक विमानाचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी लँडिंग झाले. यावेळी यशस्वी चाचणीबद्दल विमानाला वॉटर कॅननची सलामीही देण्यात आली. विकास आणि कनेक्टिव्हिटिला चालना देणाऱ्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रात निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे हे प्रतिबिंब आहे असं फडणवीस पुढे आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहेत.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी करण्यासाठी नवी मुंबईत उभारण्यात आलेलं विमानतळ लवकर सुरू होणार आहे. आज 29 डिसेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास पहिलं व्यावसायिक विमान इंडिगो A-320 चं यशस्वी लँडिंग करण्यात आलं. महिनाभरापूर्वी या विमानतळावर केलेलं लँडिंग यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं आहे. यशस्वी लँडिंग झाल्यानंतर विमानाला पाण्याची सलामी देण्यात आली.
Maharashtra's skies just got brighter! ✈️
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 29, 2024
A successful commercial flight validation test at Navi Mumbai International Airport!
This is a historic milestone for Maharashtra, the Navi Mumbai International Airport successfully conducted its first commercial flight validation test!… pic.twitter.com/Z6JOrcLrsa
मार्च 2025 पासून नवी मुंबई विमानतळ कार्यन्वित होणार आहे. एका वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी या विमानतळावरून प्रवास करू शकतील. सुमारे 5945 एकर जागेवर हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर नवीन मुंबईतील विमानतळ हे दुसरे देशातील सर्वात मोठं विमानतळ आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world