जाहिरात

Navi Mumbai Airport : नववर्षाचं खास गिफ्ट! नवी मुंबई विमानतळावर पहिल्या विमानाचे यशस्वी लँडिंग

नवी मुंबईतील विमानतळामुळे मुंबई विमानतळावरील मोठा भार कमी होणार आहे.

Navi Mumbai Airport : नववर्षाचं खास गिफ्ट! नवी मुंबई विमानतळावर पहिल्या विमानाचे यशस्वी लँडिंग
नवी मुंबई:

नवी मुंबई: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी करण्यासाठी नवी मुंबईत उभारण्यात आलेलं विमानतळ लवकर सुरू होणार आहे. आज 29 डिसेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास पहिलं व्यावसायिक विमान इंडिगो A-320 चं यशस्वी लँडिंग करण्यात आलं. महिनाभरापूर्वी या विमानतळावर केलेलं लँडिंग यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं आहे.  यशस्वी लँडिंग झाल्यानंतर विमानाला पाण्याची सलामी देण्यात आली.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च 2025 पासून नवी मुंबई विमानतळ कार्यन्वित होणार असू एका वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील. सुमारे 5945 एकर जागेवर हे विमानतळ उभारण्यात आलं असून हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर नवीन मुंबईतील विमानतळ हे दुसरे देशातील सर्वात मोठं विमानतळ आहे.

या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका असून या विमानतळावर एकाचवेळी 350 विमाने उभी राहू शकतात. येथे देशातील सर्वात मोठी कार्गो प्रणाली तयार करण्यात आली आहे. सिडको आणि जीव्हीके (GVK) यांनी एकत्र येत हे विमानतळ बांधले आहे. मुंबईपासून 40 किमी अंतरावर असणाऱ्या पनवेलजवळ हे विमानतळ बांधण्यात आले आहेत. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामे पूर्ण झाली आहे. रन वे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्त्वाची कामं पूर्ण झाली आहेत. महिन्याभरापूर्वी लँडिंग चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे. यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सुरुवातीला या विमानतळावरून वर्षाला नऊ लाख प्रवासी प्रवास करू शकतील, तर 100 टक्के काम झाल्यानंतर 60 लाखांच्या आसपास प्रवासी वर्षाला प्रवास करतील.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com