Navi Mumbai Mayor : नवी मुंबईला मिळणार महिला महापौर, 'या' नगरसेविकेच्या गळ्यात पडणार महापौरपदाची माळ?

महापौरपदासाठी भाजपच्या नेत्रा शिर्के,शिवसेनेच्या माधुरी सुतार आणि वैष्णवी नाईक या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. अखेर कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार? वाचा सविस्तर माहिती..

जाहिरात
Read Time: 2 mins
Navi Mumbai Mayor 2026 Latest News
मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai Mayor 2026 Lottery :  राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वांचं लक्ष महापौरपदाच्या आरक्षणाकडे लागलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद यंदा खुला प्रवर्ग (महिला) यासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईला पुन्हा एकदा महिला महापौर मिळणार आहे. महिला उमेदवार सलग पाचव्यांदा शहराच्या प्रथम नागरिकपदी विराजमान होणार आहे.  महिला नगरसेविकांमध्ये चार वेळा नगरसेविका झालेल्या नेत्रा शिर्के यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.  त्यांच्यानंतर शुंभागी पाटील, भारती पाटील, अंजनी भोईर, सलुजा सुतार यांच्या नावाचाही जोर आहे. 

111 नगरसेवकांपैकी 63 महिला नगरसेविका

नवी मुंबई महानगरपालिकेच्या 111 जागांसाठी 28 प्रभागांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने 65,शिवसेनेने 42, उबाठा गटाने 2 तर मनसे आणि अपक्षांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. विशेष म्हणजे,या 111 नगरसेवकांपैकी 63 महिला नगरसेविका असून 48 पुरुष नगरसेवक आहेत. त्यामुळे यंदाच्या सभागृहात महिलांचा दबदबा असणार आहे. भाजपच्या 65 नगरसेवकांपैकी 36 महिला, तर शिवसेनेच्या 42 नगरसेवकांपैकी 26 महिला निवडून आल्या आहेत. यात माय-लेक अशा दोन जोड्या तसेच काकी-पुतणी यांचाही समावेश आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभारात महिलांचा प्रभावी सहभाग दिसून येणार आहे.

नक्की वाचा >> Maharashtra Local Body Election 2026: राज्यात पहिला उमेदवार बिनविरोध, 'या' ठिकाणी शिवसेनेनं खातं उघडलं

शहर विकासाची जबाबदारी महिलांच्या हाती

महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने नवी मुंबई महापालिकेत महिलांचा आवाज अधिक बुलंद होणार आहे. शहर विकास,पायाभूत सुविधा,नागरिकांचे प्रश्न तसेच महिलांशी संबंधित मुद्द्यांवर या महिला प्रतिनिधी कसा ठोस निर्णय घेतात,याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी महापौरपद भूषवलेल्या महिला

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान सुषमा दंडे यांना मिळाला होता. त्यानंतर मनीषा भोईर,अंजनी भोईर आणि विजया म्हात्रे यांनी महापौरपद भूषवले आहे.यंदा पुन्हा एकदा हे पद महिलांसाठी आरक्षित झाल्याने नव्या नेतृत्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी 15 ठिकाणी महिलांसाठी महापौरपद आरक्षित आहे. नवी मुंबईसह मुंबई, पुणे, नाशिक,नागपूर,मीरा-भाईंदर आदी महानगरपालिकांमध्ये महिला महापौर होणार आहेत.

Advertisement

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मुंबईतील महिला नगरसेवक शिंदें गटाच्या गळाला, सेना भवनात काय घडलं?