हरित शहर, पर्यावरण पूरक शहर म्हणून नवी मुंबईची वेगळी ओळख आहे. स्वच्छतेच्या उपक्रमात पालिकेने अनेक उपक्रम राबविले आहेत. देशी वृक्षसंपदा वाढीसाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. येत्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पालिकेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांनी आंबा खाल्यानंतर कोयी फेकून न देता त्या पालिकेला द्याव्यात असे आवाहन पालिकेने केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे वर्गीकरण होणार्या कचर्यामधील आंब्याच्या कोयींचे स्वतंत्र वर्गीकरण केले जाईल. त्याचा उपयोग पर्यावरण संवर्धनासाठी केला जाणार आहे.
हेही वाचा - अभिनेता सलमान खानच्या हत्येचा आणखी एक कट उघड, धागेदोरे पाकिस्तानात
नागरिकांनी घरी आणलेले आंबे खाऊन झाल्यानंतर त्याच्या कोयी नेहमीच्या कचर्यात टाकून न देता त्या पाण्याने धुवून स्वच्छ कराव्यात. पर्यावरण दिनी या कोयी स्वतंत्र संकलन व्यवस्था केलेल्या वाहनात द्याव्यात. त्याच प्रमाणे आणि पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नवी मुंबई मनपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world