राहुल कांबळे
महावितरणचा एक बडा अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकला आहे. महावितरणमध्ये हा अधिकारी सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहे. तो तळोजा इथल्या महावितरणच्या कार्यालयात कार्यरत होता. त्याच वेळी एसीबीने सापळा रचून त्याला रंगे हात पकडले आहे. विशेष म्हणजे हा महावितरणाचा अधिकारी तरुणी असून त्याचं वय अवघं 32 वर्षाचा आहे. शिवाय त्याने मागितलेल्या लाचेची रक्कम पाहून संपूर्ण महावितरणं कार्यालय हबकलं आहे. या कारवाईनंतर कार्यालयात याच तरुणी लाचखोर अधिकाऱ्याची चर्चा रंगली आहे.
अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) नवी मुंबईच्या पथकाने गुरुवारी ही कारवाई केली. तळोजा येथील महावितरण (MSEDCL) कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्या सापळ्यात सहाय्यक अभियंता लाच घेताना रंगे हात पकडला गेला. रोहित रेवानंद मोरे असं या सहाय्यक अभियंत्याचं नावर आहे. त्याचं वय 32 वर्ष आहे. याला 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये वेगळीच चर्चा ऐकायला मिळत आहे.
पी.एन. इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या कामाचा फिजिबिलिटी रिपोर्ट द्यायचा होता. तो देण्यासाठी रोहित मोरे याने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. याबाबत तक्रारदाराने 13 जुलै 2026 रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. अशी माहिती एसीबी अधिकाऱ्याने दिली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर 14 जुलै रोजी ACB ने खरोखर लाच मागितली गेली आहे का? या ची पडताळणी केली. या पडताळणी मध्ये संबंधीत अधिकाऱ्याने लाच मागितली आहे हे निष्पन्न झाले.
त्यानुसार 23 जुलै रोजी एसीबीने सापळा रचला. दुपारी 1 वाजता तळोजा येथील महावितरण कार्यालयात रोहित मोरे यांनी तक्रारदाराकडून 50 हजार रुपये स्विकारले. त्यात 500 रुपयांच्या 100 नोटा होत्या. ही लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने मोरेला पंचांसमक्ष ताब्यात घेतले. या प्रकरणी पंचनामा व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भ्रष्टाचारासंदर्भात माहिती असल्यास किंवा कोणताही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी अॅन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world