जाहिरात

Navi Mumbai: इंग्लंडला बाईक चोरीला गेली, आता तिथेच नवी बाईक मिळाली, मराठमोळ्या बायकरची भन्नाट कहाणी

सध्या तो मुंबईत परत आला असून नवीन पासपोर्ट, व्हिसा, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स तसेच बँक कार्ड्स मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Navi Mumbai: इंग्लंडला बाईक चोरीला गेली, आता तिथेच नवी बाईक मिळाली, मराठमोळ्या बायकरची भन्नाट कहाणी
नवी मुंबई:

राहुल कांबळे 

नवी मुंबईतील बाईकर योगेश आलेकरी  याची अॅडव्हेंचर मोटारसायकल नॉटिंगहॅम (यूके) येथे चोरीस गेली होती. त्यामुळे त्याच्या  जागतिक भ्रमंतीला मोठा धक्का बसला होता. मात्र ब्रिटनमधील द ऑफ रोड सेंटर, मॅन्सफिल्ड या मोटारबाइक डीलरने त्याला मदतीचा हात दिला. त्याला नवीन KTM 790 Adventure (2020 मॉडेल) भेट दिली आहे. ही बाईक आधीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. हे सर्व आपल्यासाठी भावनिक व अविस्मरणीय आहे असं योगेशने सांगितलं. ब्रिटिश बाईकर्सनी ज्या पद्धतीने मदत केली, ते बाईकर्स ब्रदरहूडचे खरे उदाहरण आहे, असे अळेकारी म्हणाला. परंतु त्याने चिंता व्यक्त केली की ही नवीन बाइक भारतात आणताना 100 टक्के कस्टम ड्युटी भरावी लागेल. माझ्या मूळ बाइकमध्ये हे शुल्क लागले नसते. भारत सरकारला विनंती करतो की हे शुल्क माफ करावं असं तो म्हणाला. 

नक्की वाचा - ब्रिटनमध्ये धक्कादायक अनुभव! वर्ल्ड टूरवर निघालेल्या मुंबईकर बाईकरची मोटरसायकल चोरीला, मदतीचं आवाहन

33 वर्षीय योगेश आलेकरी  छोटा ट्रॅव्हल व्यवसाय चालवतो. पार्टटाईम व्लॉगर देखील आहे. तो आपल्या दुसऱ्या जागतिक सफरीवर 50 देश कव्हर करण्याच्या मोहिमेवर होता. आतापर्यंत त्याने 17 देश पार केले होते. मात्र 28 ऑगस्ट रोजी ब्रिटनमध्ये असताना त्याची KTM 390 Adventure बाइक आणि सर्व सामग्री चोरीस गेली. त्याचा मॅकबुक मात्र चोरट्यांनी टाकून दिल्याने पोलिसांच्या हाती लागला. योगेश आलेकरी यांनी NDTV मराठीशी बोलताना सांगितले  मला वाटले होते की आफ्रिकेत काही अडचणी येतील, पण असे यूकेमध्ये घडेल हे स्वप्नातही वाटले नव्हते. येथे 10 मिनिटे बाइक एकटी ठेवली तरी चोरी होण्याचा धोका आहे. अनेकांनी सांगितले की त्यांच्या गाड्याही चोरी झाल्या आहेत. जरी येथे बाईकर समुदाय अतिशय मदतीचा असला तरी पोलिस चोरीसंबंधी प्रकरणात फारसे सक्रिय नाहीत, असे आलेकरीने सांगितले.

नक्की वाचा - Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअर पोर्टवरून कुठे कुठे विमानं जाणार? एअर इंडियाने जारी केली पहिली लिस्ट

बातमी व्हायरल झाल्यानंतर ऑफ रोड सेंटर, मॅन्सफिल्ड येथील व्यवस्थापनाने त्याला 5,000 पाउंड किंमतीची नवीन बाइक भेट दिली. ही बाइक भारतात उपलब्ध नसलेले मॉडेल आहे. तसेच त्याच्या नावावर नोंदणी करून दिल्यामुळे सीमा ओलांडताना अडचण येणार नाही, याची काळजी घेतली. भारतामध्ये ही घटना घडली असती तर मुंबई पोलिस 24 तासांत बाइक शोधून काढली असती. पण ब्रिटनमध्ये एक महिना उलटूनही पोलीस निष्फळ ठरले, अशीही आलेकरीची टीका आहे. दरम्यान, काही अन्य कंपन्यांनीही त्याला कॅम्पिंग गिअर, मोस्को मोटो टँक व टेल बॅग, रायडिंग जॅकेट आणि बूट्स भेट दिले. नॉटिंगहॅम येथील भगवती शक्ती पीठ मंदिरात नवीन बाइकीचे पूजनही करण्यात आले.

नक्की वाचा - Navi Mumbai Airport : दिवाळीपूर्वीच मुंबईला 'डबल गिफ्ट'! नवी मुंबई विमानतळ, मेट्रो 3 चा मुहूर्त ठरला

सध्या तो मुंबईत परत आला असून नवीन पासपोर्ट, व्हिसा, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स तसेच बँक कार्ड्स मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर तो पुन्हा यूकेला परत जाऊन आयर्लंड, युरोप आणि आफ्रिकेतील सफर सुरू करणार आहे. अजूनही 30 देश व 35,000 किमीचा प्रवास त्याच्या पुढे आहे. इंग्लंड पोलिसांपेक्षा मुंबई पोलीस कितीतरी पटीने कॉपरेटिव्ह आहे असं त्यांनी एनडीटीव्हीसी बोलताना सांगितलं तसेच इथे माझा प्रवास थांबणार नाही, मी पुढे लगेच माझ्या जागतिक भ्रमणाला सुरुवात करणार आहे असं ही तो म्हणाला.  या चोरीच्या प्रकरणात डॉंकेस्टर येथे 18 वर्षीय तरुणाला 8 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. मात्र तो जामिनावर सुटला असून आतापर्यंत पुढील कोणतीही कारवाई झालेली नाही.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com