जाहिरात

Navi Mumbai News: पांडवकडा धबधब्यात दोन तरुण गेले वाहून, शोधकार्य सुरू, अजून दोघांचा ही पत्ता नाही

शिवाय हळहळ ही व्यक्त केली जात आहे. मात्र शोध मोहीम थांबवण्यात आलेली नाही. त्यांना शोधण्याचे प्रयत्न अजून ही सुरू आहेत.

Navi Mumbai News: पांडवकडा धबधब्यात दोन तरुण गेले वाहून, शोधकार्य सुरू, अजून दोघांचा ही पत्ता नाही
  • नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे
  • खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर जाण्यासाठी प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव बंदी घातली आहे
  • पांडवकडा धबधब्यावर गेलेले दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत
नवी मुंबई:

राहुल कांबळे 

पावसाने चांगलाच जोर धरला आहे. नवी मुंबईसह, ठाणे, रायगड जिल्ह्यालाही रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार सकाळपासून मुसळधार पाऊस होत आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. रेल्वे रस्ते मार्ग ही प्रभावीत झाला होता. त्याच वेळी अनेक ठिकाणचे धबधबे ही प्रवाहीत झाले होते. मात्र त्या ठिकाणी कोणी ही जावू नये अशा सुचाना देण्यात आल्या होत्या. मात्र या सुचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे एक धक्कादायक घटना खारघरमध्ये घडली आहे. इथल्या पांडवकडा धबधब्यावर गेलेले दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. त्यांना शोधण्याचे काम उशीरा पर्यंत सुरू होते. मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. 

खारघर येथे पांडवकडा धबधबा आहे. पावसाळ्यात या धबधब्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मात्र हा धबधबा जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच तो धोकादायक ही आहे. त्यामुळे प्रशासनाने या धबधब्यावर जाण्यास बंदी घातली आहे. असं असलं तरी अनेक उत्साही तरुणी ही बंदी  झुगारून धबधब्यावर जातात. असाच आदेश झुगारून काही तरूण या धबधब्यावर गेले होते.  त्यातील  दोन तरुण धबधब्याच्या तीव्र प्रवाहात बुडाले आहेत. शुक्रवार आणि शनिवारी दोन वेगवेगळ्या घटनांत हे दोन तरुण वाहून गेले आहेत. तरूण वाहून गेल्यानंतर त्याची माहिती स्थानिक पोलिस आणि अग्नशमन दलाला देण्यात आली. 

नक्की वाचा - Siya Goyal: सिया गोयलचे 'ते' अश्लील कृत्य! त्यात ही आता नवा वाद, वडिलांनी केला भलताच दावा

त्यानंतर  फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ताडीने शोधकार्य युद्धपातळीवर सुरू केले. मात्र मोठ्या प्रमाणात होणार पाऊस.पाण्याचा प्रवाह यामुळे शोधकार्यात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अजून ही या दोन्ही तरूणांचा काहीच पत्ता लागलेला नाही. त्या तरुणांचे काय झाले असेल हे सांगता येत नाही. त्यांचे कुटुंबीयांवर मात्र मोठे आभाळ कोसळले आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. शिवाय हळहळ ही व्यक्त केली जात आहे. मात्र शोध मोहीम थांबवण्यात आलेली नाही. त्यांना शोधण्याचे प्रयत्न अजून ही सुरू आहेत. 

नक्की वाचा - Lohagad Case: सिया-चेतनला मोठा दिलासा! बाहेर येण्याचा मार्ग मोकळा, कोर्टाच्या निर्णयाने पुणे पोलीसांना झटका

​तळोजा फेज 1 सागरविहार बिल्डिंग, जनता गॅरेजजवळ मोहम्मद मोबशीर मोहम्मद शाहिद हा राहत होता. त्याचे वय वीस वर्षे होते. हा तरूण पांडवकडा परिसरात पाण्याच्या प्रवाहात बुडाला आहे. तर दुसरा तरुणा हा मुंबईतल्या सांताक्रुझचा आहे. त्याचे वय 19 वर्ष आहे. शेण्णोन गॅस्पर किनी असं या तरुणाचं नाव आहे. तो ही धबधब्याच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला आहे. पांडवकडा धबधब्यावर जाण्यास बंदी आहे. प्रशासनाने आता कडक इशारा दिला आहे. शिवाय धबधब्याकडे जाण्याचा मार्ग ही बंद करण्यात आला आहे. कुणीही धबधब्यावर जावू नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com