अजित पवार गटाला 'घड्याळ' चिन्ह वापरता येणार की नाही? सुप्रीम कोर्टात आज होणार फैसला

मागील सुनावणीवेळी शरद पवार गटानं नवीन अर्ज दाखल केला होता. त्यात यापूर्वी सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना चिन्ह वापरताना मजकूर वापरण्याचे आदेश दिले होते. मात्र अजित पवार गटाकडून चिन्हसोबत मजकूर वापरला जात नसल्याचा आक्षेप शरद पवार गटाकडून घेण्यात आला होता. 

Advertisement
Read Time: 2 mins

रामराजे शिंदे, नवी दिल्ली

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे लवकर सुनावणी घेण्याची विनंती शरद पवार गटाने केली होती. सुप्रीम कोर्टाने ही विनंती मान्य करत 1 ॲाक्टोबरला म्हणजे आजच सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीतून स्पष्ट होईल अजित पवारांना दुसरे चिन्ह दिले जाईल की घड्याळच राहणार आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मागील सुनावणीवेळी शरद पवार गटानं नवीन अर्ज दाखल केला होता. त्यात यापूर्वी सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना चिन्ह वापरताना मजकूर वापरण्याचे आदेश दिले होते. मात्र अजित पवार गटाकडून चिन्हसोबत मजकूर वापरला जात नसल्याचा आक्षेप शरद पवार गटाकडून घेण्यात आला होता. 

( नक्की वाचा :  'शरद पवार म्हणजे मिनी औरंगजेब', दीड महिन्यात.... भाजपा नेत्याची जोरदार टीका )

याशिवाय हे प्रकरण अद्याप कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाऐवजी दुसरे चिन्ह द्यावे अशी विनंती शरद पवार गटाने माननीय सुप्रीम कोर्टाला केली होती. मात्र कागदपत्र उशीरा मिळाल्यामुळे उत्तर दाखल करण्यास अजित पवार गटानं कोर्टाकडे वेळ मागितला.

(नक्की वाचा- सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ)

पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला होणार होती, पण आचारसंहिता लागू होणार असल्याचं शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात सांगितले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने लवकर सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली. त्यानुसार 1 ऑक्टोबरला सुनावणी ठेवली होती.

Topics mentioned in this article