जाहिरात

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि ढाब्यांच्या खाद्यपदार्थांच्या दरांवर परिणाम होऊ शकतो. या ठिकाणी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. 

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका सर्वसामान्यांना बसला आहे. केंद्र सरकारने  व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे.  व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 48.50 रुपये ते 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे आता व्यावसायिक सिलेंडर 1740 रुपयांना मिळणार आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इंडियन ऑइलने जारी केलेल्या दरांनुसार, 1 ऑक्टोबर 2024 पासून, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईत 1692.50 रुपये, कोलकात्यात 1850.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1903 रुपये असेल. गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्येही व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 39 रुपयांनी वाढ झाली होती. त्यापूर्वी सिलेंडरच्या किमती 1652.50 रुपये होती.

(नक्की वाचा-  EPFO च्या नियमात बदल, आता 50 हजार ऐवजी 1 लाख रुपये काढता येणार)

जुलै महिन्यापासून किंतमी किती वाढली? 

जुलै 2024 पासून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे.  1 जुलै 2024 रोजी तेल कंपन्यांनी LPG किमतीत कपातीची भेट दिली होती. मात्र पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर 8.50 रुपयांनी महागला. त्यानंतर सप्टेंबरला महिन्यातही सर्वसामान्यांना महागाईचा धक्का बसला.

(नक्की वाचा-  अदाणी मुंद्रा क्लस्टरचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ट्रान्झिशनल इंडस्ट्रियल क्लस्टर्समध्ये समावेश)

कोणला बसणार फटका? 

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि ढाब्यांच्या खाद्यपदार्थांच्या दरांवर परिणाम होऊ शकतो. या ठिकाणी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्य सरकारकडून नुकसान भरपाईसाठी 1927 कोटी मंजूर
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ
NCP Ajit Pawar group can use Clock symbol or not? Supreme Court will decide today political news
Next Article
अजित पवार गटाला 'घड्याळ' चिन्ह वापरता येणार की नाही? सुप्रीम कोर्टात आज होणार फैसला