मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांच्या खेळीने शिंदे बॅकफूटवर

Maharashtra CM: अजित पवारांची राष्ट्रवादी 41 आमदारांसह देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने आहे. अशा स्थितीत निवडणुकीनंतर बदललेल्या परिस्थितीत हे पूर्णपणे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने झुकलेले दिसत आहे.     

जाहिरात
Read Time: 2 mins

किसका होगा महाराष्ट्र, आज हो सकता है तय.

महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात स्पर्धा सुरू आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय जवळपास घेतल्याचे मानले जात आहे. एकनाथ शिंदे यामुळे बॅकफूटवर गेले आहेत. 288 पैकी 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बहुमतचा आकडा गाठण्यासाठी भाजपला केवळ 13 आमदारांची गरज आहे. 

अजित पवारांची राष्ट्रवादी 41 आमदारांसह देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने आहे. अशा स्थितीत निवडणुकीनंतर बदललेल्या परिस्थितीत हे पूर्णपणे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने झुकलेले दिसत आहे.     

(नक्की वाचा - VIDEO : "थोडक्यात वाचलास, दर्शन घे दर्शन", अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला)

फडणवीसांची बाजू भक्कम का?

  • अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपला 'फडणवीस प्लान' स्पष्ट केला आहे. अजित पवार यांची मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा आहे. 
  • भाजप आपला अंतिम निर्णय एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कधीही सांगू शकतो. शिंदे ठाम आहेत, पण त्यांच्याकडे सहमतीशिवाय पर्याय नाही.
  • भाजपला अजित पवारांचा पाठिंबा असल्याने शिंदे गट फार काळ अडून राहू शकणार नाही. 
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली जाणार आहे. दोघांना कोणते मंत्रिपद द्यायचे याबाबतही चर्चा सुरू आहेत. 
  • शिंदे आणि अजित पवार लवकरच अमित शहा यांची दिल्लीत भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(नक्की वाचा - विधानसभा निवडणुकीत पराभव का झाला? शरद पवारांनी सांगितली 3 कारणं)

भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता कोण होणार?

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची त्यांच्या पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक अजून व्हायची आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड प्रक्रिया केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत होते. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निरीक्षक महाराष्ट्रात येताच विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात येणार आहे. यामध्ये विधीमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल. 

Advertisement