निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीला सपाटून मारा खावा लागला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तर हातावर मोजण्या इतक्या म्हणजे 10 जागाच मिळाल्या. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत असं कधीच झाले नव्हते. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. पराभवानंतर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नव्हती. पण निकालाच्या चोविस तास उलटून गेल्यानंतर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. शिवाय पराभव का झाला त्या मागची 3 कारणंही त्यांनी सांगितली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पराभवानंतर पहिल्यांदाच बोलताना शरद पवारांनी सांगितले की अपेक्षा होती तसा निर्णय आला नाही. पण लोकांनी दिलेला हा निर्णय आहे. अनेक वर्ष सामाजिक जिवनात काम करत आहे. पण असा अनुभव कधी आला नाही. पण आता आला आहे, तर त्याचा अभ्यास करण गरजेचं आहे. त्यातून नक्की काय झालं हे जाणून घेता येईल. आता हा पराभव विसरून नव्या उत्सहात लोकांमध्ये जाणं हा आमच्या समोर पर्याय आहे असंही शरद पवार यावेळी म्हणाले. नव्या दमाने लोकांमध्ये जाणार असल्याचं ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - काँग्रेसला अति आत्मविश्वास नडला, चंद्रपूरात मोठा उलटफेर कसा झाला?
कारण क्रमांक 1
विधानसभा निवडणुकीत पराभव का झाला याची प्रमुख 3 कारण यावेळी शरद पवारांनी सांगितली. त्यातलं महत्वाचं कारण त्यांनी सांगितलं ते म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजने मुळे मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदान केलं. पण आमच्या विरोधकांनी असा प्रचार केली की जर सत्ता बदल झाला तर आम्ही लोक ही योजना बंद करू. त्यामुळे महिलांना चिंता वाटू लागली. त्यामुळे त्यांनी आमच्या विरोधात मतदान केल्याचं वाटत आहे असे शरद पवार म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - महायुतीचा पुढचा प्लॅन काय? केसरकरांनी आतली बातमी सांगितल
कारण क्रमांक 2
पराभवाचं दुसरं कारण सांगताना शरद पवार म्हणाले की राज्यात धार्मिक ध्रृविकरण केलं गेलं. जाती जाती धर्मा धर्मात भांडणं लावली गेली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री इथे प्रचाराला आले होते. त्यांनी बटेंगे तो कटेंगे चा नारा दिला. त्यामुळे वेगळं वातावरण राज्यात निर्माण झालं. त्यानंतर एक है तो सेफ है चा नारा दिला. त्यामुळे ही निवडणूक वेगळ्या वळणावर गेली. त्याचा परिणाम ही मतदारांवर झालेला दिसला. हे आमच्या विरोधात गेले असेही पवार म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - शिंदेंनी भर विधानसभेत जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं, काय बोलले होते शिंदे?
कारण क्रमांक 3
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे येवढा पैशांचा वाटप या निवडणुकीत झाल्याचं शरद पवार म्हणाले. आमच्या कार्यकर्त्यां बरोबर मी बोलत आहे. त्यांच्या बोलण्यातून ही बाब समोर येत आहे असं पवार म्हणाले. यातून मतं खरेदी केली गेलीत की काय अशी शंका निर्माण होत आहे असंही ते म्हणाले. असं कधीही महाराष्ट्रात झालं नव्हतं. ईव्हीएमवर बोलतानाही त्यांनी सांगितलं. की काही जण सांगत आहेत ही ही ईव्हीएम गुजरातमधून आली होती. पण त्याबाबत आपल्याकडे माहिती नाही असं ही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world