महायुतीत रस्सीखेच, भाजप आमदार राहुल कुल यांच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा

Daun Vidhan Sabha election 2024 : वीरधवल जगदाळे यांच्या मागणीनंतर दौंडच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Read Time: 1 min

देवा राखुंडे, दौंड

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी इच्छूकांनी उमेदवारी लॉबिंग सुरु केली आहे. महायुतीत देखील तिन्ही पक्षाच्या नेत्यांना एकमेकांवर दबावाचा राजकारण सुरु केलं आहे. भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा सांगितला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी, अशी मागणी करण्यात आली आली आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे अशी मागणी केली आहे. 

(नक्की वाचा - ठाकरे भडकले! 'गेट आऊट' ऑफ इंडिया करून दाखवा, मग्रुरीने माफी नको')

वीरधवल जगदाळे यांच्या मागणीनंतर दौंडच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभेला सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवावी याची पहिली मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली होती.  ती मागणी मान्य देखील झाली होती. 

(नक्की वाचा- विधानसभेला किती जागा लढणार? अजित पवारांनी पहिल्यांदाच आकडा सांगितला)

त्यानंतर वीरधवल जगदाळे यांनी आता दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी पक्षाकडे गेल्यास आमदार राहुल कुल यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article