छगन भुजबळांची भूमिका दुटप्पी, शरद पवारांच्या भेटीवरुन अनिल देशमुखांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीस ओबीसी नेत्यांना आश्वासने देत आहे. गेल्या वर्षभरात या दोन्ही समाजाला काय आश्वासने दिली हे त्यांनी सांगितलं पाहिजे, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.

Advertisement
Read Time: 2 mins

छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन राज्यातील वातावरण बिघडलं आहे. शरद पवार यांनी पुढाकार घेऊन राज्यातील वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करावा, यासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचं छगन भुजबळांना सांगिततं. मात्र छगन भुजबळ यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अनिल देशमुख यांनी म्हटलं की, भुजबळ साहेब दुटप्पी भूमिका घेत आहेत. एकीकडे बारामतीला टीका करायची आणि त्यानंतर पवार साहेबांना आज भेटायला जायचं. तिथे आपण मार्गदर्शन करा असं सांगायचं ही दुटप्पी भूमिका आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीस ओबीसी नेत्यांना आश्वासने देत आहे. गेल्या वर्षभरात या दोन्ही समाजाला काय आश्वासने दिली हे त्यांनी सांगितलं पाहिजे. आम्हाला वर्ष भरात काय चर्चा केल्या त्याची सविस्तर माहिती दिली नाही आणि थेट चर्चेला बोलावले. आधी माहिती द्यायला हवी होती, असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं. शरद पवार आजारी आहेत, तब्येत ठीक झाली की ते मार्गदर्शन करतील, असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं.

(नक्की वाचा-  शरद पवारांची अचानक भेट का घेतली? छगन भुजबळांनी सविस्तर सांगितलं)

कुणालाही पुन्हा पक्षात घेणार नाही- अनिल देशमुख

छगन भुजबळांचे परतीने प्रयत्न सुरु आहेत का? याबाबत बोलताना अनिल देशमुख यांनी म्हटलं की, परतीचे प्रयत्न केले तरी कुणालाही पक्ष परत घेणार नाही, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. अजित पवारांना विधानसभेत स्वतंत्र लढायला लावतील. भाजपचा काही भरोसा नाही. वेळेवर आम्हाला माघार घ्यायला लावतील, अशी अजित पवारांच्या आमदारांमध्ये चर्चा आहे, असा दावाही अनिल देशमुख यांनी केला आहे. 

Advertisement

(नक्की वाचा- 'बघून येतो...' बोलून गेलेले भुजबळ वर्षभराने शरद पवारांच्या भेटीला, तो फोनचा किस्सा पुन्हा चर्चेत)

महायुती सरकार अस्वस्थ- जितेंद्र आव्हाड

महायुती सरकार अस्वस्थ आहे. सरकार ट्रॅपमध्ये अडकलं आहे, त्यांना काय करावं समजत नाहीये. लोकांमध्ये सरकारबाबत सरकारच्या मग्रुरीबद्दल राग आहे. जनता बरोबर निर्णय घेते. तुम्ही आमदार विकत घेतले, मात्र जनता विकत घेता येत नाही. सरकारल जमत नसेल तर राजीनामा द्यावा. आम्ही येणारच आहोत, आम्ही निर्णय घेऊ. हे केंद्र सरकारचं काम आहे, पंतप्रधानांना भेटा असं आम्ही वारंवार सांगितलं होतं, असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

Topics mentioned in this article