जाहिरात

'बघून येतो...' बोलून गेलेले भुजबळ वर्षभराने शरद पवारांच्या भेटीला, तो फोनचा किस्सा पुन्हा चर्चेत

छगन भुजबळ महायुती नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहेत. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

'बघून येतो...' बोलून गेलेले भुजबळ वर्षभराने शरद पवारांच्या भेटीला, तो फोनचा किस्सा पुन्हा चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार वर्षभरापूर्वी  2 जुलै 2023 रोजी महायुती सरकारमध्ये सामील झाले झाले होते. राष्ट्रवादीचे जवळपास 40 आमदारांनी अजित पवारांसोबत जाण्याची निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय झालं हे सर्वांना माहिती आहे. 

मात्र त्यावेळी शरद पवार यांनी छगन भुजबळांबद्दल सांगितलेला किस्सा गाजला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडत असताना छगन भुजबळांनी शरद पवारांना फोन केला होता. त्यावेळी नेमकं काय सुरुये हे बघून आलो, असं शरद पवारांना सांगून छगन भुजबळ गेले ते परतलेच नाही. छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीदरम्यान हा किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद पवारांनी सांगितलेला किस्सा

शरद पवारांनी हा किस्सा भर सभेत सांगितला होता. शरद पवारांनी म्हटलं होतं की, छगन भुजबळांचा मला फोन आला होता. त्यांनी मला विचारलं हे काय चाललंय. मी सांगितलं मलाही कल्पना नाही. त्यावेळी भुजबळ म्हणाले, मी जातो बघतो, बोलतो आणि तुम्हाला कळवतो. त्यानंतर मी दुपारी पाहिलं की त्यांनी शपथच घेऊन टाकली. त्यामुळे बघतो बोललं की मला भीती वाटते.    

(नक्की वाचा - भुजबळ भाषणाला उभे राहीले, मराठा समाजाने काय केले? दादांच्या बारामतीत काय झाले?)

2 जुलै 2023 चा तो दिवस आणि त्यानंतर तब्बल 378 दिवसांनी छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. छगन भुजबळ महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मात्र भेटीचं नेमंक कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

(नक्की वाचा - पायी वारी करणाऱ्यांना मिळणार पेन्शन, राज्य सरकारकडून ‘वारकरी महामंडळ'ची स्थापना)

छगन भुजबळ वेटिंगवर

छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या भेटीसाठी वेळ घेतली नव्हती. त्यामुळे छगन भुजबळ यांना शरद पवार यांना भेटण्यासाठी काही वेळ वाट पाहावी लागली. या भेटीचं नेमकं कारण काय हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com