Amol Mitkari : दंगली का भडकतात? राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा थेट सरकारलाच सवाल

Amol Mitkari : औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राचा आताचा विषय होऊ शकत नाही. ज्या संघटना अशा दंगली भडकवत असले त्यांच्यावर तत्काळ बंदी आणा, अशी मागणी देखील अमोल मिटकरी यांनी केली.   

जाहिरात
Read Time: 2 mins
Amol Mitkari : दंगली का भडकतात? राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा थेट सरकारलाच सवाल

औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरू झालेल्या वादाचे पडसाद नागपुरात पाहायला मिळाले. नागपूरात सोमवारी रात्री दोन गटात जोरदार राडा झाला. नागपूर शहरातील महाल भागात जोरदार दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली. अनेक गाड्यांची फोडतोड करण्यात आली. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी सरकारलाचा सवाल केला आहे. यावेळी अमोल मिटकरी यांनी मंत्री नितेश राणे आणि आमदार अतुल भातखळकर यांच्यावरही निशाणा साधला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं, औरंगजेबची कबर छत्रपती संभाजीनगरला आहे आणि दंगल नागपूरला होते. आंदोलन करणाऱ्यांनी कबरीऐवजी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आंदोलन करायला पाहिजे होते. प्रशांत कोरटकरने महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्यावेळी आंदोलन करणारे कुठे होते? संतोष देशमुख यांचे मारेकरी पकडण्यासाठी आंदोलन का केलं नाही? महत्त्वाच्या विषयांना बगल देण्यासाठी असे मुद्दे काढले जात आहेत. पंधरा दिवसात अधिवेशनात शेतकऱ्यांचा एकही विषय चर्चेला न येणे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Nagpur Crisis News: दगड-विटांचा मारा, गाड्यांची जाळपोळ, परिसरात तणाव... नागपूर का पेटलं?

नागपूरची दंगल ही महाराष्ट्राला परवडणारी नाही. आरोपी मोकाट आहे. शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा प्रशांत कोरटकर पोलिसांच्या संपर्कात आहे. थडगं काम राहावं, त्याचं उदात्तीकरण होऊ नये ही भूमिका राज्यातील अनेकांची आहे. 300 वर्षांपूर्वीचा इतिहात आता शेतकरी संकटात असताना बाहेर काढणे हे महाराष्ट्राला शोभणारे नाही, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

Advertisement

दंगली घडवलेल्या संघटनांवर बंदी आणा

ज्या संघटनानी या दंगली घडवल्या. ज्यांनी मजारवरी चादर काढली. मुस्लीमांच्या घरात तलवार घेऊन जाणे. मग  एका गटाकडून प्रतिक्रिया आल्यानंतर दुसऱ्या गटाकडून प्रतिक्रिया येणे साहजिक आहे. मी कुणाची बाजू घेत नाही. मात्र महाराष्ट्रातला शेतकरी संकटात असताना  अशा दंगली होणे बरोबर नाही. माझा सरकारमध्ये असताना माझा सरकारला सवाल आहे या दंगली का भडकतात? आपलं याकडे लक्ष का नाही. औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राचा आताचा विषय होऊ शकत नाही. ज्या संघटना अशा दंगली भडकवत असले त्यांच्यावर तत्काळ बंदी आणा, अशी मागणी देखील अमोल मिटकरी यांनी केली.   

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Nagpur Crisis: नागपुरमध्ये जोरदार राडा! 2 गटात दगडफेक, पोलीस उपायुक्तांकडून कुऱ्हाडीने हल्ला

राणे-भातखळकरांना इतिहासाची पुस्तके देणार

नितेश राणे आणि अतुल भातखळकर यांनी त्यांच्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल ते बोलले आहेत. नितेश राणे आणि अतुल भातखळकर यांना इतिहासाची पुस्तके देणार आहे. त्यांनी शिवचरित्र वाचावं. तुम्ही म्हणता म्हणून तसा इतिहास असू शकत नाही. हे सांगतात तसं शिवचरित्र असू शकत नाही. या राज्यात सगळ्यांना राहण्याचा अधिकार आहे, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं.  

Topics mentioned in this article