"गुलाबी जॅकेट घातले तरी गद्दारीचा रंग कसा लपवणार", अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा

राज्यात महाविकास आघाडीला 165 पेक्षा अधिक जागा मिळतील. मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होईल. ट्रंम्पेटचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला तरीही आमचे 31 खासदार निवडून आले. जनता सुज्ञ आहे यंदा असं होणार नाही, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

अविनाश पवार, शिरुर

शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अंगावर गुलाबी जॅकेट चढवलं. तुम्ही कितीही गुलाबी जॅकेट घातले तरी तुम्ही गद्दारीचा रंग कसा लपवणार, असा निशाणा अमोल कोल्हे यांनी अजित पवारावर साधला आहे. 

महाराष्ट्रात चुकीला माफी आहे, गद्दारीला थारा नाही हे महाराष्ट्र दाखवून देईल. घड्याळ जरी चोरलं असलं तरी वेळ आता तुतारीची आहे. पराभव समोर दिसत असल्याने अजित पवार भावनिक आवाहन करत आहेत. 35 वर्ष समाजकारण करत असताना अजित पवारांना वस्तुस्थितीची जाणीव झाली असावी. त्यामुळे त्यांना भावनिकतेचा आधार घ्यावा लागत असेल. मात्र शरद पवार सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण ही भूमिका बारामतीकर पार पाडणार आहे, असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला. 

(नक्की वाचा-  "महाराष्ट्राच्या दुश्मनांचे बुट चाटू नका", संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका)

राज्यात महाविकास आघाडीला 165 पेक्षा अधिक जागा मिळतील. मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होईल. ट्रंम्पेटचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला तरीही आमचे 31 खासदार निवडून आले. जनता सुज्ञ आहे यंदा असं होणार नाही. महाविकास आघाडीला राज्यभर पोषक वातावरण आहे, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

महायुती सरकार येणार नाही

देवेंद्र फडणवीस हुशार माणूस आहे. त्यांनी स्वतः कबुली दिली मी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये नाही. कारण तुमचं सरकारच येणार नाही, तर तुम्ही मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये कसे असणार, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी महायुतीवर निशाना साधला. 

Advertisement

(नक्की वाचा- रितेश भाऊविरोधात साऊथ सुपरस्टार मैदानात; देशमुखांच्या गडात पवन कल्याणचा झंझावात)

 विषारी बीज उगवायला ही गंगा-यमुनेची माती नाही

देवेंद्र फडणवीस यांना महायुती सत्तेत येत नाही हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणून शेवटचा प्रयत्न म्हणून योगी आदित्यनाथ यांच्याद्वारे 'बटेंगे तो कटेंगे' आणि आता 'वोट जिहाद' सांगत आहेत. मात्र फडणवीस यांना विसर पडला आहे की राज्यात विषारी बीज उगवायला ही गंगा यमुनेची माती नाही, तर सह्याद्रीचा काळा पत्थर आहे, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली.