घड्याळाचे काटे फिरणार? अजित पवारांना नवीन चिन्हावर निवडणूक लढावावी लागण्याची शक्यता

शरद पवार यांच्या पक्षाकडून काल सुप्रीम कोर्टात प्रकरण मेन्शन केलं गेलं आहे. हे प्रकरण लवकर ऐकण्याची विनंती देखील शरद पवार गटाने कोर्टाकडे केली आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह घड्याळ याबाबतची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत जो पर्यंत सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही, तो पर्यंत अजित पवार यांच्या पक्षाला नवीन चिन्ह द्यावं. विधानसभा निवडणुका असल्यामुळे पक्ष नाव आणि घड्याळ चिन्हाचा वापर अजित पवारांना करू देऊ नका, अशी विनंती शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात केली आहे. 

निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे तो आमदारांच्या आधारावर दिला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांना नवीन चिन्ह घेण्यास सांगावं. शरद पवार यांच्या पक्षाकडून काल सुप्रीम कोर्टात प्रकरण मेन्शन केलं गेलं आहे. हे प्रकरण लवकर ऐकण्याची विनंती देखील शरद पवार गटाने कोर्टाकडे केली आहे. 

(नक्की वाचा-  Manoj Jarange : मनोज जरांगे यांची तब्येत खालावली; आज बीड आणि धाराशिव बंदची हाक)

प्रकरणाची सुनावणी येत्या 25 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट याबाबत सुनावणी कधी घेणार हे आज येणाऱ्या कोर्टाच्या लिस्टमधून स्पष्ट होणार आहे. यापूर्वी देखील 2 वेळा शरद पवार यांच्या पक्षाकडून हे प्रकरण मेंशन करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कोर्टाने त्यावर सुनावणी घेतली नव्हती.

(नक्की वाचा: जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मविआ घेणार बाहेरची मदत, बैठकीत नेमकं काय ठरलं?)

पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह संदर्भात 12 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दोन महिन्यानंतर सुनावणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी निकाल लागण्याची शक्यता नाही. उद्धव ठाकरेंना मशाल आणि शरद पवारांना तुतारी चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढवावी लागणार आहे.

निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह बहाल केलं. त्या विरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात अपिल केले. तर अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह दिल्याचा निर्णयाविरोधात शरद पवारांनी  सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

Topics mentioned in this article