NCP News : शरद पवार गटात मतभेद? जयंत पाटलांवर तरुण नेते नाराज असल्याची सूत्रांची माहिती

NCP News: जयंत पाटलांच्या या भूमिकेमुळे शरद पवार गटातील तरुण नेतृत्वात, आमदारांमध्ये मोठी नाराजी आहे.  जयंत पाटील अनेकांना गेल्या काही दिवसात नियुक्त पत्र देत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

NCP News : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटात पुन्हा मतभेद पाहायला मिळत आहेत.  शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात तरूण नेतृत्वामध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर पुन्हा नवनियुक्ती होण्याच्या आधीच अनेकांना पदांचं वाटप करत असल्याने पक्षातील अनेक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जयंत पाटलांच्या या भूमिकेमुळे शरद पवार गटातील तरुण नेतृत्वात, आमदारांमध्ये मोठी नाराजी आहे.  जयंत पाटील अनेकांना गेल्या काही दिवसात नियुक्त पत्र देत आहेत. संघटनात्मक निवडीचा कार्यक्रम सुरू असताना थेट नियुक्त देत असल्याने रोहित पवार यासह अनेकजण नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

Advertisement

( नक्की वाचा-  Political News : सांगलीत ठाकरे गटाला धक्का, चंद्रहार पाटील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?)

जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून नवीन नेतृत्व देण्यात यावा अशी मागणी मागील काही कालावधीत पार्टीच्या एका मेळाव्यात करण्यात आली होती. मात्र आता जयंत पाटील परस्पर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत असल्याने रोहित पवारांसह अनेक आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची माहिती आहे. जयंत पाटील यांच्या परस्पर नियुक्तीच्या भूमिकेवरून शरद पवारांपर्यंत आता नाराजी पोहोचवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  Dhananjay Munde : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे सध्या काय करतात? नवी माहिती समोर)

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात खोडा कुणाचा?

राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणावरून अजित पवार गटात मतभेद असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या काही नेत्यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी समर्थन आहे तर दुसरा गटाचा याला विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणास ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचाच विरोध असल्याचा जोरदार चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारांमध्ये प्रफुल पटेल यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे. अशात दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचा मुद्दा आल्यास प्रफुल पटेल यांचा पत्ता कट होण्याची शक्यता अधिक आहे. तर जयंत पाटलांमुळे सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष पद सोडावं लागण्याची शक्यता आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article