राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील यांनी आपलं विधानसभेतील पहिलं भाषण गाजवलं. रोहित पाटलांनी विधानसभेत अवघ्या 6 मिनिटांचं पहिलं भाषण केलं. मात्र संपूर्ण सभागृहाला त्या भाषणाने आर आर पाटलांची आठवण झाली. रोहित पाटील यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे देखील रोहित पाटील यांनी अभिनंदन केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना रोहित पाटील यांनी संत तुकारामांच्या अभंगाचा उल्लेख केला. रोहित पाटील यांनी भाषणात म्हटलं की, संत तुकारामांच्या वाणीतून अभंग आला आहे, "अमृताहूनि गोड तुझे नाम देवा." संतांच्या वाणीतून देखील आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं आहे. त्यामुळे पुढच्या काळात काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला देखील गोड पद्धतीच वागणून द्याल, अशी विनंती आपल्याला करतो. पुराणामध्ये देखील अमृताला वेगळे महत्व होतं आणि आजही वेगळं महत्त्व आहे, असं देखील रोहित पाटलांनी म्हटलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील हसू आवरलं नाही.
(नक्की वाचा- "नाना पटोलेंनी वाट मोकळी केली म्हणून... "देवेंद्र फडणवीसांनी पहिल्याच भाषणात मानले आभार)
लोकशाहीमुळे देश वेगळेपण टीकवू शकला
भाषणाच्या सुरुवातीला रोहित पाटील यांनी म्हटलं की, देशाने अनेक शाह्या पाहिल्या आहेत. मात्र लोकशाही अत्यंत महत्त्वाची शाही आपल्या वाट्याला आली. त्यामुळे आपला देश वेगळेपण टीकवू शकला. संसदीय पद्धतीमुळे आपल्या लोकशाहीला वेगळं महत्त्व आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या एकमताच्या अधिकाराने इथे सर्व सन्माननीय सदस्य बसले आहेत.
(नक्की वाचा- 'मविआ'ला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची दाट शक्यता; केजरीवाल सरकारचा फॉर्म्युला लागू होणार?)
मी देखील सर्वात तरुण आमदार
अध्यक्ष महोदय आपण जसा सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून मान पटकावला आहे, तसाच मी सर्वात कमी वयाचा विधानसभा सदस्य म्हणून मान पटकावला आहे. त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून सर्वात तरुण सदस्याकडे तुमचं बारीक लक्ष असेल, अशी विनंती करतो. तसेच माझ्यावर लक्ष असावं यासाठी दुसरं कारण म्हणजे तुम्ही निष्णात वकील आहात आणि मी देखील वकीलीचं शिक्षण पूर्ण करत आहे. एक नंबरच्या बाकावरील वकिलाकडे (देवेंद्र फडणवीस) जसं तुमचं लक्ष असतं, तसं याही वकिलावर लक्ष असू द्या अशीही विनंती मी तुमच्याकडे करतो, असं रोहित पाटील यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world